व्हॉट्सऍपचा 'हा' मेसेज ठरेल धोकादायक ! अजिबात देऊ नका रिप्लाय 

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

व्हॉट्सऍपचा 'हा' मेसेज ठरेल धोकादायक ! अजिबात देऊ नका रिप्लाय 

नवी दिल्ली - व्हॉट्सऍप हे जगातील सर्वाधिक वापरले जाणारे मल्टीमीडिया मेसेजिंग ऍप आहे. जगात ज्या वस्तूला सर्वाधिक मागणी असते, त्या वस्तूच्या नावावरही सर्वाधिक फसवणूक होते. व्हॉट्सऍपच्या बाबतीतही तेच आहे. व्हॉट्सऍपच्या नावाखाली दररोज फसवणुकीच्या घटना घडतात. आता व्हॉट्सऍपच्या नावावर मोठी फसवणूक सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.

व्हॉट्सऍपच्या नावावर फसवणूक कशी होते?
वास्तविक यावेळी सायबर ठगांनी नवा मार्ग शोधला आहे. हे ठग लोकांना व्हॉट्सऍप सपोर्टच्या नावाने मेसेज करत आहेत. अशा परिस्थितीत लोकांना वाटते की कंपनीनेच त्यांच्याशी संपर्क साधला आहे आणि ते त्यांची माहिती देत आहेत. हे ठग लोकांना व्हॉट्सऍप सपोर्टच्या नावाने जे मेसेज पाठवत आहेत, त्यामध्ये एक वेब लिंक देखील आहे, ज्यावर क्लिक केल्यानंतर एक फॉर्म उघडला जातो ज्यामध्ये वापरकर्त्यांना त्यांची वैयक्तिक माहिती विचारली जाते.

व्हेरीफाईड प्रोफाइल वापरले जात आहे?
हे ठग इतके हुशार आहेत की ते व्हेरिफाईड अकाउंट प्रोफाइल वापरत आहेत. वास्तविक हे ठग व्हॉट्सऍप व्यवसाय खाते (बिझनेस अकाउंट) वापरत आहेत. यावर व्हॉट्सऍपने त्यांची पडताळणी केली आहे. आता जेव्हा हे लोक व्हॉट्सऍप सपोर्टच्या नावाने मेसेज करतात, तेव्हा लोकांना व्हेरिफाईड अकाऊंट दिसते. त्यामुळे त्यांना असे वाटते की व्हॉट्सऍपने खरोखरच त्यांना मेसेज केले आहे. मात्र सत्य हे आहे की व्हॉट्सऍप कधीही कोणत्याही यूजर्सला मेसेज करत नाही. एखाद्यावेळी  व्हॉट्सऍपकडून कोणत्याही फीचरबद्दल मेसेज केला गेला तरी, ते वैयक्तिक माहिती विचारत नाहीत. त्यामुळे यापुढे असे मेसेज आले की, ताबडतोब डिलीट करून त्याबद्दल इतरांना सावध करणे योग्य ठरेल.