काहीही झालं तरी मातोश्री बाहेर हनुमान चालिसा वाचण्याचा राणा दाम्पत्याचा निर्धार

काहीही झालं तरी मातोश्री बाहेर हनुमान चालिसा वाचण्याचा राणा दाम्पत्याचा निर्धार

मुंबई, दि. 23 एप्रिल – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बंगल्यासमोर हनुमान चालिसाचे वाचन करणार असल्याचे राणा दाम्पत्याने जाहीर केले आणि मुंबईत अभूतपूर्व गोंधळ सुरू झाला. आज सकाळी ९ वाजता राणा दाम्पत्य हनुमान चालिसाचे वाचन करणार होते परंतु पोलिसांनी त्यांना घरीच स्थानबद्ध केले. इकडे मातोश्रीवर ४००-५०० शिवसैनिक राणांना विरोध करायला जमले होते. राणा दाम्पत्यांना ‘प्रसाद’ देण्याची त्यांनी तयारी केली होती. राणा दाम्पत्य येऊ शकत नाही हे पाहिल्यावर शिवसैनिकांनी त्यांच्या बंगल्याकडे धाव घेऊन बंगल्यात घुसण्याचा प्रयत्न केला. बंगल्यात घुसून रवी व नवनीत राणा यांना प्रसाद देण्याचा त्यांचा विचार होता. मात्र पोलिसांनी त्यांचा हा प्रयत्न हाणून पाडला.

बंगल्याबाहेर पोलिसांनी बॅरिकेट्स लावले होते ते तोडून शिवसैनिकांनी बंगल्यात घुसण्याचा प्रयत्न केला. या वेळी अभूतपूर्व गोंधळ उडाला होता. अजूनही बंगल्याबाहेर शिवसैनिक राणा दाम्पत्याची प्रतिक्षा करीत उभे आहेत. शिवसैनिक अ‍ॅब्युलन्स घेऊन राणाच्या घराबाहेर पोहोचले आहे. अ‍ॅब्युलन्सच्या पाठीमागे "राखीव बंटी बबली" असा पोस्टरदेखील लावण्यात आला आहे. तर मुख्यमंत्र्यांनी पोलिसांना हाताशी धरुन आम्हाला रोखले, त्यांना दुसरे काहीच काम नाही. पोलिस आम्हाला जाण्यापासून अडवत आहेत. आमच्या घरावर हल्ला करण्यामागे उद्धव ठाकरेंचा हात आहे. मात्र आम्ही जाणारच, महाराष्ट्रात लक्ष देण्यासाठी आपण पंतप्रधान मोदींना विनंती करणार, असे नवनीत राणा म्हणाले. काल पत्रकार परिषदेत राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर अनेक आरोप केले होते. मुख्यमंत्री विदर्भात येत नाहीत. शेतकऱ्यांच्या बांधावर येत नाहीत. दोन वर्षे मंत्रालयात येत नाहीत. राज्याचा विकास खुंटला आहे. ही साडेसाती दूर करण्यासाठी मातोश्रीवर हनुमान चालिसेचे पठण झाले पाहिजे, अशी विनंती आम्ही केली होती. पण काही लोकांनी त्याला विरोध केला. हनुमान चालिसेला विरोध करणारे बाळासाहेबांचे शिवसैनिक असूच शकत नाहीत. मातोश्रीवरून हनुमान चालिसेला विरोध होत असेल तर उद्धव ठाकरे हिंदुत्व विसरले आहेत.

या घटनेवरून सत्ताधारी व विरोधकांनी एकमेकावर आरोप करीत आहेत. कोण कोणाला काय म्हणाले ते पाहूयात.

सरकार असल्याने आमचे हात बांधलेले आहेत. लायकीप्रमाणे राहा, शिवसेनेला अव्हान देऊ नका. शिवसेनेला पुरून उरण्यासाठी ७ जन्म घ्यावी लागतीलः संजय राऊत

आम्हाला सत्तेची पर्वा नाही, शिवसेना हीच सत्ता आहे. शिवसेना कार्यकर्ते मारायला आणि मरायलाही तयारः राऊत

राष्ट्रपती राजवटीच्या धमक्या आम्हाला देऊ नकाः राऊत

मातोश्रीवर घुसण्याची कुणाची हिंतम नाहीः संजय राऊत

आमच्या घरात घुसण्याचा प्रयत्न कराल तर आम्हाला पोलिसांच्या संरक्षणाची गरज नाही. शिवसेना कार्यकर्ते उत्तर देण्यास सक्षमः राऊत

तुम्ही लक्ष्मण रेषा ओलांडाल तर शिवसेना कार्यकर्ते तुमच्या घरापर्यंत पोहोचतील, संजय राऊतांचा इशारा

दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसेना कार्यकर्ते उरले नाहीत. पोलिस शिवसेना कार्यकर्त्यांना का अडवत नाहीत, रवी राणांचा सवाल

मुख्यमंत्र्यांकडून सत्तेचा दुरुपयोग. आमच्यावर हल्ला झाल्यास मुख्यमंत्र्यांची जबाबदारी, रवी राणांचं वक्तव्य. 'मातोश्री'वर जाण्यास राणा दाम्पत्य ठाम

नौटंकी बंद करा आणि मातोश्रीवर येऊन दाखवा, वरुण सरदेसाई यांचं राणा दाम्पत्याला आव्हान

राणा दाम्पत्यानेच ही परिस्थिती निर्माण केली. त्यांनीच त्यांच्या जीवाची काळजी घ्यावी. राणा दाम्पत्याला कोणीतरी फूस लावतयः दिलीप वळसे पाटील, गृहमंत्री

आमच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न, पोलिस आम्हाला थांबवत आहेत. शिवसेना कार्यकर्त्यांकडून गुंडगिरी सुरू. हनुमान चालिसेला एवढा विरोध का? आमदार रवी राणांचा सवाल

राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्यासारथी स्थिती निर्माण झाली आहे. कायदा सुव्यवस्था पुर्णपणे बिघडली आहे, असा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केले आहे.

राणा दाम्पत्यांची ही स्टंटबाजी सुरू आहे. शिवसेना त्यांना त्यांच्या पद्धतीने उत्तर देणारच. देशात महागाई, रोजगारासारखे अनेक प्रश्न आहेत. हनुमान चालिसा पठण करण्यासाठी दुसऱ्याच्या घरी कशासाठी जाता? हे सगळं पब्लिसिटीसाठी राणा दाम्पत्याचा ड्रामा आहे. असे राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ म्हणाले.

आम्ही काय करावे आणि काय करु नये हे गृहमंत्र्यांनी आम्हाला शिकवू नये, असे म्हणत नवनीत राणा यांनी गृहमंत्र्यांना प्रत्युत्तर दिलंय.

राणा दाम्पत्य सुपारी घेऊन आले आहे, राणांना महाराष्ट्रात वादंग हवा आहे. हा मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव आहे. नवनीत राणा यांनी मातोश्रीवर येऊनच दाखवावे – महापौर किशोरी पेडणेकर

पोलिस शिवसेनेच्या दबाबाखाली काम करत आहे, पोलिस आम्हाला अडवण्याचा प्रयत्न सुरू आहे, मात्र आम्ही जाणारच - नवनीत राणा

राणा दाम्पत्याच्या स्वागतासाठी शिवसैनिक सज्ज आहेत, त्यांनी दिल्लीत जाऊन हनुमान चालिसाचे पठण करावे, अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार अनिल देसाई यांनी दिली आहे.