पीएमपीएमएलच्या बस चालकांचा अचनाक संप; प्रवाशांचे अतोनात हाल
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
पिंपरी-चिंचवड, दि. 22 एप्रिल - पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपीएमएल)च्या खासगी ठेकेदारांनी आज (शुक्रवार) सकाळपासून अचानक बस वाहतूक थांबवली. त्यामुळे पीएमपीच्या ताफ्यातील सुमारे 650 बसची वाहतूक ठप्प झाली आहे. त्यामुळे शहरातील वाहतूक खोळंबली असून प्रवाशांचे हाल होत आहेत. दरम्यान, ठेकेदारांवर अत्यावश्यक सेवा कायद्यान्वये (मेस्मा) कारवाई करण्याची नोटीस पीएमपीने सर्व ठेकेदारांना पाठवली आहे.
थकबाकी मिळावी म्हणून हा संप करण्यात आल्याचे वाहतुकदारांचे म्हणणं आहे. तर, हा दबावतंत्राचा भाग असल्याचे पीएमपीने स्पष्ट केले आहे. पीएमपीमध्ये सुमारे सात खाजगी ठेकेदारांच्या 956 बस भाडेतत्त्वावर धावतात. यापैकी सुमारे 650 ते 700 बस दररोज मार्गावर धावतात. या बसची वाहतूक शक्रवार सकाळपासून बंद झाली. त्यामळे पीएमपी प्रशासनाची तारांबळ उडाली. ठेकेदारांना गुरुवारीच 54 कोटी रुपये मंजूर केले आहेत. ते पैसे आज त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होतील. पीएमपीच्या 1200 पैकी जास्तीत जास्त गाड्या रस्त्यावर आणण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. तसेच संपर्क करणाऱ्या ठेकेदारांना अत्यावश्यक सेवा कायद्यान्वये नोटीसही बजावण्यात आली आहे, असे पीएमपी प्रशासनाकडून सांगण्यात आले.
पीएमपी ठेकेदारांची देणी देण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने नुकतेच 86 कोटी पीएमपीकडे वर्ग केलेले आहेत. तरी देखील पीएमपीएमएलच्या खासगी भाडेतत्त्वावरील सर्व ठेकेदारांनी अचानक संप पुकारल्यामुळे पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील पीएमपीची सेवा पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. नोकरदार, विद्यार्थी, कामगार, ज्येष्ठ नागरिक यांचे मोठ्या प्रमाणावर हाल झाल्याचे पहायला मिळाले आहे. पीएमपीच्या कंत्राटी ठेकेदारांनी अचानक पुकारलेल्या बंदमुळे, चालक-वाहक सेवक पहाटे 4 वाजल्यापासून डेपोत बसून होते. काम न मिळाल्याने त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.