भाजपने शरद पवारांच्या विधानाची मोडतोड करून गैरसमज पसरविले

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

भाजपने शरद पवारांच्या विधानाची मोडतोड करून गैरसमज पसरविले

पिंपरी-चिंचवड, दि. 12 मे – सातारा येथील एका कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार बोलत होते. तेव्हा त्यांनी अस्पृश्यता पाळत ठराविक लोकांना देवळात येऊ न देणाऱ्यांवर टीका करताना एका कवीच्या काही ओळी वाचून दाखवल्या होत्या. त्यांच्या विधानाची मोडतोड करून शरद पवारांविषयी गैरसमज पसरविण्याचा प्रयत्न भाजपने केला आहे. त्यांना नास्तिक ठरविण्याचा उद्योग भाजपने केला आहे.   त्याच्या या उद्योगाचा राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी चांगलाच समाचार घेतला आहे.

रोहित पवार म्हणतात की, अस्पृश्यतेच्या मनोवृत्तीला ठेचण्यासाठी संत ज्ञानोबा माउलींपासून संत तुकोबा, संत गाडगेबाबा, शाहू-फुले-आंबेडकरांपर्यंत सर्वच महामानवांनी सामाजिक चळवळ उभी केली. अण्णाभाऊ साठे,  नामदेव ढसाळ, जवाहर राठोड या सारख्या साहित्यिकांनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून अस्पृश्यतावादी मानसिकतेवर आपल्या लेखणीतून घणाघात केला आणि समाजाला अन्यायाची जाण करून दिली.

राजकीय आरोप करण्यासाठी भाजपने आदरणीय पवार साहेबांनी दिलेल्या संदर्भाची मोडतोड करून नास्तिकता शोधली, परंतु त्याच संदर्भात अस्पृश्यतेवर केलेला घणाघात भाजपला दिसला नाही, हीच भाजपची खरी मानसिकता आहे.

जवाहर राठोड यांच्या कवितेच्या संदर्भास नास्तिकतेचे नाव देऊन भाजपने त्यांची खरी मानसिकता तर दाखवलीच आहे, शिवाय समाज सुधारणा चळवळीचा देखील अपमान केला आहे.

मुळात देव आणि धर्म यांना भाजपा नेहमीच केवळ आणि केवळ राजकारणाच्या चष्म्यातून बघत असल्याने खरा देव आणि खरा धर्म भाजपला कधी कळला नाही आणि कधी कळणारही नाही. त्यामुळेच पुरोगामी समाजसुधारकांना भाजपने आजवर नेहमीच पाण्यात पाहिले आहे.

सर्वच समाजसुधारकांच्या काळात देखील अशा मनुवृत्ती होत्या आणि त्या मनुवृत्तींनी नेहमीच या सर्व समाजसुधारकांचा विरोध केला. आज माऊली, तुकोबा, गाडगेबाबा हे महापुरुष असते तर त्यांना देखील नास्तिक म्हणून भाजपने हिणवले असते, कारण हाच भाजपचा खरा विचार आणि चेहरा आहे.

असो, हा महाराष्ट्र आहे.. इथे तुमच्या मनुवृत्तीची डाळ कधीही शिजणार नाही, त्यामुळे आता तरी सुधारा!