जैन सोशल ग्रुप डायमंड तर्फे फेडरेशन 'डे' सप्ताह स्वरुपात विविध कार्यक्रमांनी साजरा

जैन सोशल ग्रुप डायमंड तर्फे फेडरेशन 'डे' सप्ताह स्वरुपात विविध कार्यक्रमांनी साजरा


चिंचवड, (प्रबोधन न्यूज )  -  जैन सोशल ग्रुप डायमंड फेडरेशनचा १७ ऑगस्ट हा जैन सोशल ग्रुपचा फेडरेशन डे म्हणून सर्वत्र साजरा करण्यात येतो. समाजात अशा अनेक व्यक्ती आहेत, ज्यांना मदतीचा हात आपण दिला तर त्यांचे आयुष्य सुकर होऊ शकते. इतकेच नव्हे तर अहिंसेचा मार्गाचा अवलंबन करणारा जैन बांधवाने तर मुक्या जनावरांना ही अभय दान द्यावे या विचार मंथनातून अध्यक्ष प्रशांत गांधी आणि धवल पटेल, सिद्धार्थ शहा, कुमार शहा, पारस लोडया, मनोज बाफना, विजय मुनोत, पवन शहा, अक्षय शहा, पंकज गुगळे आदींनी सपत्नीक विविध कार्यक्रमाचे आयोजन नीरज शहा आणि सर्व कार्यकारिणी ने फेडरेशन वीक च्या निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन केले.


जैन सोशल ग्रुप डायमंड ने सर्वप्रथम सावली आश्रमाला भेट देऊन विविध वस्तूंचे भेट स्वरुपात वाटप करण्यात आले. यामध्ये अनेक जीवन उपयोगी वस्तू औषधे, स्वच्छतेच्या दृष्टीने अनेक वस्तू भेट देण्यात आल्या. गेली अनेक दिवस चाललेल्या सामाजिक उपक्रमाची सुरुवात 15 ऑगस्ट रोजी अध्यक्ष प्रशांत गांधी आणि टीम ने विश्व कल्याण स्कूल मध्ये झेंडा वंदन करून केली त्यामधील मुलांना त्यांच्या सशक्त भारत बनविण्यासाठी त्यांची जबाबदारी ची जाणीव करून दिली. त्यानंतर पाटीदार भवन येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करून उपक्रम राबविण्यात आला. त्यामध्ये ८४ जणांनी रक्तदान केले. गोग्रास या उपक्रमांतर्गत या गोशाळेला भेट देऊन एक ट्रक भर चारा आणि विविध उपयोगी वस्तूंचे भेट देण्यात आली. याच उपक्रमंतर्गत वृक्षारोपणाचाही कार्यक्रम राबविण्यात आला. यामध्ये मानवी जीवनाला आवश्यक असणाऱ्या झाडांची वृक्ष लागवड करण्यात आली.

'मेरी बेटी मेरी अभिमान' मोहीमेमध्ये सभासदांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला आणि आपल्याला मुलगी असल्याचा अभिमान व्यक्त केला. या विविध कार्यक्रमास डायमंड कमिटीच्या मेंबरने स्वतः नेतृत्व घेऊन कार्यक्रमाच्या भेटी पासून वस्तू देण्याचे पूर्ण आयोजन नियोजन उत्साहात केले. विविध स्वरूपाचे राबविण्यात आलेल्या कार्यक्रमास ग्रुपच्या सभासदांचा उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. त्यामुळे हा फेडरेशन डे निमित्त आयोजित सप्ताह उत्साहात साजरा झाला. अध्यक्ष प्रशांत गांधी सचिव धवल पटेल आणि सर्व कार्यकारिणीने इतर पदाधिकारी, सभासदांनी सहभाग नोंदवीत सामाजिक बांधिलकी ची जाणीव आणि तळमळ यातून व्यक्त केली.