शिक्षक-पदवीधर निवडणुकीसाठी ठाकरे गटाकडून उमेदवारांची घोषणा

शिक्षक-पदवीधर निवडणुकीसाठी ठाकरे गटाकडून उमेदवारांची घोषणा

मुंबई , (प्रबोधन न्यूज )  -  लोकसभा निवडणूक संपल्यानंतर २६ जून रोजी होऊ घातलेल्या विधानपरिषद निवडणुकीसाठी ठाकरे गटाकडून उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून यासंदर्भात पत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे.

शिवसेना ठाकरे गटाकडून मुंबई पदवीधर मतदारसंघातून आमदार अनिल परब तर मुंबई शिक्षक मतदारसंघातून ज. मो. अभ्यंकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे आता ठाकरे गटाकडून आतापासूनच विधानपरिषद निवडणुकीची मोर्चेबांधणी सुरु झाली आहे..

अनिल परब हे शिवसेनेचे विधानपरिषदेत प्रतिनिधित्व करतात. उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय म्हणून त्यांची ओळख आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात त्यांनी परिवहन मंत्री म्हणून जबाबदारी सांभाळली होती. ते रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्रीही होते.