राजच्या उत्तर सभेला मविआच्या नेत्यांकडून करारा जबाब

राजच्या उत्तर सभेला मविआच्या नेत्यांकडून करारा जबाब

मुंबई, दि. १३ एप्रिल - करारा जबाब मिलेगा म्हणत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी ठाण्यात सभा घेतली. गुढी पाडव्याला राज ठाकरेंच्या सभेवर अनेक नेत्यांनी टीका केली होती. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी राज यांनी ठाण्यात सभा घेतली. या सभेत त्यांनी शरद पवार, जयंत पाटील, सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड, अजित पवार यांच्यावर टीका केली.

या टिकेनंतर खवळलेल्या या नेत्यांनी राज ठाकरेंचे अक्षरशः वाभाडे काढले आहेत. जयंत पाटील यांचा उल्लेख राज ठाकरे यांनी जंत ठाकरे असा केला होता. त्याला उत्तर देताना जयंत पाटील म्हटलंय की, काही लोक मराठी व्याकरण, काना-मात्रा विसरतात, त्यांच्यासाठी पुन्हा वर्ग सुरू करावे लागतील असा टोला त्यांनी लगावला आहे. तर राज्य सरकारला कुणीही अल्टीमेटम देऊ शकत नाही. ती ताकद या देशात फक्त फक्त बाळासाहेब ठाकरे यांच्याकडेच होती, असे राऊत यांनी सुनावलं आहे. तसेच, काल ठाण्यात वाजलेला भोंगा हा भाजपचाच होता. भाजपला महाविकास आघाडीविरोधात सरळ राजकारण करता येत नाही म्हणून त्यांनी राज ठाकरेंना पुढे आणल्याचा आरोपही संजय राऊत यांनी केला. राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांचा चेहरा नागासारखा दिसतो, अशी टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंगळवारी आपल्या उत्तरसभेत केली. त्यानंतर आता जितेंद्र आव्हाड यांनी देखील राज ठाकरेंच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. "माझा चेहरा नागा सारखा आहे याचा मला अभिमान आहे, पण त्यांचा चेहरा कोंबडीच्या कोणत्या भागा सारखा आहे हे राज ठाकरे यांनी आरशात तपासून घ्यावे" असे प्रत्युत्तर जितेंद्र आव्हाड यांनी राज ठाकरेंना दिले आहे.