शरद पवारांच्या घरावरील हल्ला प्रकरण प्रीप्लँटच, धागेदोरे हाती लागले

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

शरद पवारांच्या घरावरील हल्ला प्रकरण प्रीप्लँटच, धागेदोरे हाती लागले

मुंबई, दि. १३ एप्रिल - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्वर ओक या निवासस्थानावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी दररोज धक्कादायक माहिती समोर येत आहे. पोलिसांनी आंदोलनाशी संबंधित नागपूरमधील 'त्या' व्यक्तीचा छडा लावल्याची माहिती समोर येत आहे.

पोलिसांनी बुधवारी या प्रकरणातील मुख्य आरोपी गुणरत्न सदावर्ते यांच्यासह अभिषेक पाटील, कृष्णात मोरे, सच्चिदानंद पुरी, चंद्रकांत सुर्यवंशी, ताज्जुदीन शेख आणि इतर आरोपींना न्यायालयात हजर केले. यावेळी सरकारी वकील प्रदीप घरत यांनी नागपूरमधील व्यक्तीबाबत धक्कादायक माहिती दिली आहे. आरोपींनी आंदोलनठिकाणी आधीच पाहणी केल्याचे सीसीटिव्हीतून स्पष्ट झालं आहे. आंदोलनावेळी सर्वजण सिल्वर ओक येथील गार्डन मध्ये जमले होते. अभिषेक पाटील हा आंदोलकांना मार्गदर्शन करत होता, असं घरत यांनी स्पष्ट केलं आहे.

आंदोलनाशी संबंधित काही ऑडिओ क्लिपही पोलिसांच्या हाती लागल्या आहेत. सूर्यंवशीच्या तपासात रात्री ११ ते पहाटे २:५० पर्यंत सदावर्तेंच्या इमारतीच्या टेरेसवर जयश्री पाटील, नागपूरची व्यक्ती, आणि इतरांची बैठक झाली. या बैठकीत जयश्री पाटील यांनी कामगारांना मार्गदर्शन केले, त्याही आरोपी असून सध्या फरार आहेत. ८ एप्रिल रोजी सदावर्तेंनी नागपूरच्या व्यक्तीला फोन केला होता. त्यावेळी ती व्यक्ती मुंबईतच होती. आंदोलन नागपूरची व्यक्ती हाताळत होती, अशी माहिती घरत यांनी दिली. पण ही व्यक्ती कोण आहे, याबाबत माहिती देण्यात आलेली नाही.

सदावर्ते यांनी सर्व पैशांचा हिशोब लिहून ठेवला असून ती डायरी पोलिसांच्या हाती लागली आहे. सदावर्तेंनी विविध एसटी डेपोतून कामगारांकडून पैसेगोळा केले आहेत. काही एसटी कामगाराचेही पोलिसांनी जबाब नोंदवले आहेत. या गुन्ह्यात कलम ४०६ आणि कलम ४०९ वाढवलेले आहेत. कोट्यावधी रुपयाचा अपहार झाला आहे, असं घरत यांनी न्यायालयात सांगितलं.

सदावर्ते यांनी गोळा केलेल्या पैशांचा वापर आंदोलनासाठी करण्यात आलेला नाही. एसटी कर्मचार्यांकडून मोठ्या प्रमाणात पैसे उकळले आहेत. घेतलेल्या पैशाच्या पावत्या नाहीत. साधारण दोन कोटींच्यावर ही रक्कम आहे. या पैशाचा आंदोलनात वापर केलेला नाही, अशी माहिती घरत यांनी न्यायालयात दिली. यावेळी त्यांनी सदावर्ते यांच्या पोलीस कोठडीचीही मागणी केली.