शरद पवारांच्या घरावर एसटी कर्मचाऱ्यांचा हल्ला

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

शरद पवारांच्या घरावर एसटी कर्मचाऱ्यांचा हल्ला

एसटी कर्मचारी पवारांच्या घरावर चालून गेले

एसटी कर्मचाऱ्यांकडून चपला, दगडांचा वर्षाव

सुप्रिया सुळेंची जमावाला हात जोडून शांत राहण्याची विनंती

प्रती हल्ला करण्याचा संतप्त राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा इशारा

मुंबई, दि. 8 एप्रिल - राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या बंगल्यावर संतप्त आंदोलकांच्या जमावानं अचानक हल्लाबोल केला आहे. शरद पवार हाय हाय अशा घोषणा देत हा जमाव घराच्या दिशेनं चालून आला. त्यांनी चपला, दगड घरावर भिरकावल्या असून या घटनेनंतर राष्ट्रवादीच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी घराकडे धाव घेत आंदोलकांशी प्रत्यक्ष चर्चा करण्याची तयारी दर्शिवली आहे. हा प्रकार आज दुपारी तीनपासून सुरू आहे.

आंदोलकांनी जवळपास पाच महिने झाले तरीही शासनाने आमच्या एसटी कर्मचाऱ्यांच्या रास्त मागण्या अद्याप पूर्ण झाल्या नाहीत. महाविकास आघाडी सरकारच्या चोरांचे चाणक्य शरद पवार आमच्याकडे बघायला तयार नाही. आमच्या कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्यांच्या मृत्यूला शरद पवार जबाबदार आहेत, अजित पवारही जबाबदार आहेत. एसटी कर्मचारी शहिद झाले आहेत.

एसटी कर्मचारी संतप्त झाले असून, अचानक पवारांच्या बंगल्यात घुसून त्यांनी घरावर चपलांचा वर्षाव केला, दगडफेकही केली. भारत माता की जय, वंदे मातरम् अशा घोषणा आंदोलकांनी दिल्या आहेत. या घटनेनंतर पोलिस लगेचच घटनास्थळी पोहचले असून ते आंदोलकांना समजावत आहेत.

माझे आई, वडील घरात आहेत. त्यांची स्थिती काय आहे हे मला पाहू द्या, मी दोनच मिनिटांत त्यांना बघून तुमच्याशी चर्चा करते अशी विनंती सुप्रिया सुळे यांनी आंदोलकांना केली. सुळे यांनी आंदोलकांना हात जोडून विनंती केली असून, आता यावेळीही आंदोलक संतप्त आहेत.

कोरोनात गरज आहे असे सांगता अन् नंतर आम्ही मेलो तरी चालते, त्यापेक्षा आम्हाला सर्वांनाच संपवा, गेली पाच महिने वेळ नव्हता आता सुप्रिया सुळे कशा आल्या असा सवालही आंदोलकांनी केला आहे.

आमचे कष्ट बघा, घाम बघा आम्हाला काहीही मोबदला दिला नाही. सत्य परिस्थिती तुम्ही जाणून घ्या. आमचे सहकारी आम्ही गमावले या सर्व एसटी कर्मचाऱ्यांच्या मृत्यूला शरद पवार व महाविकास आघाडी जबाबदार आहे त्यांनी अद्यापही न्याय दिला नाही अशा संतप्त भावना आंदोलकांनी केल्या आहेत.

आमच्या नेत्यांनी फक्त विलिनीकरणाचा मुद्दा सोडून सर्व मागण्या मान्य केल्या आहेत. सदावर्ते आणि त्यांच्या बगलबच्चांनी ठरवून हा हल्ला केला. आम्ही सडेतोड उत्तर देऊ. फक्त आमच्या नेत्यांच्या आदेशाची प्रतिक्षा आहे, आम्ही घरात घुसून मारू अशा संतप्त प्रतिक्रिया राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी दिल्या आहेत.