भाजपला खिंडार; पक्षाच्या माजी नगरसेवक,  पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

भाजपला खिंडार; पक्षाच्या माजी नगरसेवक,  पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

चिंचवडची जनता भाजपला धडा शिकवेल – अजित पवार

पिंपरी – भारतीय जनता पक्षाच्या भ्रष्ट कारभाराला कंटाळून त्या पक्षाच्या अनेक माजी नगरसेवकांनी आज राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपला खिंडार पाडत अजित पवार यांनी त्या पक्षाच्या नेत्यांना 440 व्होल्टचा आज (दि. १८) झटका दिला. या धक्क्याने अख्य्या चिंचवड विधानसभेत खळबळ निर्माण झाली असून भाजप बॅकफूटवर गेला आहे. दरम्यान अत्यवस्थ असलेल्या लोकप्रतिनिधींना प्रचाराला आणि मतदानाला बोलावणाऱ्या या स्वार्थी आणि भ्रष्ट भाजप नेत्यांनीच भावनेचा बाजार मांडल्याने चिंचवडची निवडणूक ही भावनिकतेवर नव्हे तर विकासकांच्या जोरावर जिंकू असा विश्वासही अजित पवार यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.

महाविकास आघाडीचे चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार विठ्ठल उर्फ नाना काटे यांच्या प्रचारार्थ आयोजित भव्य सभेत अजित पवार बोलत होते. यावेळी त्यांनी राज्यकर्त्यांसह शहर भाजपच्या धोरणांचा आणि भ्रष्ट कारभाराचा आपल्या खास शैलीत समाचार घेतला. या सभेतच

माजी नगरसेवक तुषार कामठे, विजय सुतार, माजी नगरसेविका विजयाताई सुतार यांच्यासह प्रसाद कांबळे, राजन नायर, संजिवनी जगताप, रोहित मुणगेकर, मिलिंद कांबळे, आदींसह शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपाला रामराम ठोकत राष्ट्रवादीसोबत विकास वाटेवर चालण्याचा निर्धार करत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

यावेळी व्यासपीठावर माजी मंत्री शशिकांत शिंदे, माजी मंत्री राजेश टोपे, माजी आमदार विलास लांडे, अतुल लोंढे, आमदार व निरीक्षक सुनील शेळके, चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार विठ्ठल उर्फ नाना काटे, त्यांच्या पत्नी तथा माजी नगरसेविका शीतल काटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, युवक अध्यक्ष इम्रान शेख, महिलाध्यक्ष कविता आल्हाट, पुण्याचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, कांग्रेसचे शहराध्यक्ष कैलास कदम, शिवसेनेचे शहराध्यक्ष सचिन भोसले, रविकांत वर्पे, पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य निवृत्तीआण्णा बांदल, माजी महापौर संजोग वाघेरे, माजी नगरसेवक गोरक्ष लोखंडे, बाबुराव चांदेरे, गणेश खांडगे, प्रशांत शितोळे, आरपीआयचे (खरात गट) सचिन खरात, जगदीश शेट्टी, सुलक्षणा शिलवंत, फझल शेख, संतोष कोकणे, विनोद नढे, निलेश पांढारकर, धनंजय भालेकर, सुजाता नांदगुडे, लताताई ओव्हाळ, सायली नढे, शाम जगताप, तानाजी जवळकर यांच्यासह महाविकास आघाडीतील विविध पक्षांचे पदाधिकारी, आजी माजी नगरसेवक उपस्थित होते. 

यावेळी बोलताना अजित पवार यांनी भाजपच्या कारभाराचा अक्षरश: पंचनामा केला. महापुरुषांचा अपमान, राज्याबाहेर गेलेले मोठे प्रकल्प, वाढती बेरोजगारी, महागाई, राज्यात सरकार असंविधानिक पद्धतीने आलेले सरकार, तोडफोडीचं आणि खोक्यांचे राजकारण, लोकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष यासह जनतेच्या विविध मूलभूत प्रश्नांना हात घालत अजितदादांनी राज्य सरकारवर खरमरीत टीका केली.

पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, आम्ही कारभार करत असताना अडचणी आमच्याही पुढे होत्या. करोना काळात आम्ही आमची जबाबदारी चोख पार पाडली. पिंपरी - चिंचवड शहराच्या विकासासाठी केलेल्या कामांची जंत्रीच पवारांनी यावेळी सादर केली. शरद पवारांच्या दूरदृष्टीने या शहरात आयटी पार्क उभे राहिले. त्यातूनच शहराच्या विकासाची पायाभरणी झाली. आज पिंपरी चिंचवड जागतिक नकाशावर आहे त्याचे कारण त्यामागे राष्ट्रवादीने केलेल्या विकासकामांमध्ये दडले आहे.

गद्दार कोण?

ज्यांना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी पदे दिली. सन्मान दिला, घरात जागा दिली, त्यांनी त्याच घरात चोरी केली आणि जाताना घराची पाटीही पळवून नेली. शिवसैनिकांनी रक्त ओकून वाढवलेली संघटना भाजपाच्या दावणीला कोणी बांधली. निवडणूक आयोगाचा कालचा निकाल काय सांगतो? याचा विचार करण्याची वेळ आली आहे. या निर्णयाला उध्दव ठाकरे सर्वोच्च न्यायालयात आव्हान निश्चित देतील, असा विश्वास व्यक्त करतानाच 50 खोके, एकदम ओके सगळ्यांनाच पटलं, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.

ज्या महापुरुषांची नावे घेऊन तुम्ही राजकारण करता त्या महापुरुषांनी तुम्हाला हेच शिकवलं का? स्वार्थासाठी किती टोकाची भूमिका घेणार? महाराष्ट्र तुम्हाला कधीही माफ करणार नाही. जनतेला न रुचणारा निर्णय घेतला तर जनताच त्याला उत्तर देते, असा टोलाही त्यांनी लगावला. राजकारण इतकी वर्षे करणाऱ्या भाजपला स्वतःचे कार्यकर्तेही तयार करता आले नाहीत. आमचेच कार्यकर्ते फोडून नेले. ज्यांना स्वत:चे कार्यकर्ते उभे करता आले नाहीत, ते राज्याचा विकास काय करणार? असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

अंगात पाणी नसणारे जनतेला पाणी कुठून देणार?

शहरात पाण्याचा प्रश्न गहन आहे. शहर वेगाने वाढत आहे. पवनेच पाणी आणायचे ठरवले, त्यात खूप अडचणी आल्या. माझी भूमिका स्पष्ट आणि स्वच्छ होती. सर्वांनाच पाणी मिळायला हवे. त्यात आम्ही कधी राजकारण आणले नाही. भाजपने पाच वर्षात नुसत्या घोषणा केल्या. भामा आसखेड, अंद्रा धरणाचे पाणी आणू, पण पाणी काही शहरवासीयांना मिळाले नाही. या उलट जॅकवेलचा घोटाळा तेवढा झाला. पाणी कुठेयं? अंगातच पाणी नसणारे जनतेला कुठून पाणी देणार? असा प्रहारही पवार यांनी केला.

नान काटेंकडे विकासाची व्हिजन

महापालिकेत नगरसेवक म्हणून काम करताना नाना काटे यांनी त्यांच्या प्रभागाचा कायापालट केला. पिंपळे सौदागरच्या प्रभागाकडे शहरातील एक विकसीत प्रभाग म्हणून पाहिले जाते. विकास करण्यासाठी धमक असावी लागते. ती धमक आणि अनुभव नानांकडे आहे, व्हिजन आहे, ते इथले भूमिपुत्र आहेत. नवीन पिढीला प्रोत्साहन द्यायचं आहे. चिंचवडच्या सर्वांगिन विकासासाठी नाना काटे यांना भक्कम साथ द्या, असे आवाहनही पवार यांनी यावेळी केले.

सोसायट्यांचा समस्या आणि भ्रष्टाचाराचा सुकाळ

शहरात राहणाऱ्या आयटीयन्सचा विकासावर विश्वास आहे. बाहेरून येणाऱ्यांसाठी हे शहर सुरक्षित आणि सुंदर उद्योजकांना आकर्षण वाटणारे झाले आहे. ते यावेळी विकसीत आणि सुंदर राहिले पाहिजे. परंतू भाजपच्या सत्ताधाऱ्यांनी शहराची वाट लावण्याचे पाप केले आहे. त्यांच्या काळात सोसायट्यांसमोर अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. झोपडपट्टीधारकांना चांगली घरे द्यायची आहेत परंतू त्याचा साधा विचारही भाजपने केला नाही. सोसायट्यांमधील कचऱ्याची समस्या, रेडझोन, सीसीटीव्ही घोटाळा, किती घोटाळे गेल्या पाच वर्षांत या लोकांनी केले, त्याचा हिशोब विचारण्याची हीच वेळ आहे. भाजपाचे सत्ताधारी घोटाळ्यात तरबेज असून त्यांचे घोटाळे पुराव्यासह जनतसमोर मांडणार असल्याचेही पवार म्हणाले.

जाती-जातींमध्ये तणाव

अलीकडे जाती-जातींमध्ये तणाव निर्माण करण्याचे घाणेरडे राजकारण सुरू असून प्रज्ञा सातव, जितेंद्र आव्हाड, आदित्य ठाकरे यांच्या सारख्या नेत्यांवर हल्ले होत आहेत. यावर सत्ताधारी पक्षातील कोणीच काही बोलायला तयार नाही. भाजपचा एक नेता मला करंट द्यायला निघाला आहे. परंतू त्याने आमचा करंट असून बघितलेलं नाही! कुणी काहीही बोलावं, काहीही करावं? असाच प्रकार सुरू आहे. पुण्याचे पालकमंत्री बालिशपणाचा कहर करतात. ते काहीही बोलतात, असा टोलाही पवार यांनी चंद्रकांत पाटील यांचे नाव घेता लगावला.

भावनिकतेवर भाजपने बोलूच नये

भाजपचे नेते निवडणुकीच्या वेळी कोणत्याही स्तरावर जातात हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. गिरीश बापट हे अत्यवस्थ असताना त्यांना प्रचारासाठी आणलं जात आहे, यांची त्यांना लाज वाटत नाही? माणसं जोडायची असतात, तोडायची नसतात. लक्ष्मण जगताप, मुक्ता टिळक यांना रुग्णवाहिकेतून अत्यवस्थ असताना मतांसाठी मुंबईला नेण्यात आल होत. माणूस जिवंत असताना त्याचा स्वार्थासाठी वापर करणारे आता भावनिकतेच्या लाटेवर मते मागायला निघाले आहेत. ज्यांनी जिवंत माणसांचा विचार केला नाही, ते भावनिकतेवर मते मागतात. त्यांनी भावनिकेवर बोलूच नये. येथील जनता भाजपला पोटनिवडणुकीत धडा शिकविल्याशिवाय स्वस्थ बसणार नसल्याचेही पवार म्हणाले.यावेळी आ. सुनील शेळके, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहराध्यक्ष सचिन भोसले, अतुल लोंढे यांनीही मनोगत व्यक्त केले

नाना काटे म्हणाले, मी 2007 पासून नगरसेवक म्हणून काम करतोय. अजित पवारांचे सतत मार्गदर्शन मिळते. इथे 40 टक्के आयटीयन्स आहेत. मात्र, या भागात आयटी कंपन्या केवळ शरद पवार यांनी आणल्या. महापालिकेत आणि राज्यात आमची सत्ता असताना आम्ही या भागाचा झपाट्याने विकास केला. मात्र, भाजपच्या भ्रष्ट कारभारामुळे इथे गेल्या ५ वर्षांत अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. आयटीच्या मंडळींना इथला खरा विकास कोणी केला हे माहित झालं आहे. त्यामुळेच त्यांचा आम्हालाच भक्कम पाठिंबा मिळत आहे. येथील सर्वसामान्य माणसापासून आयटी अभियंतेही महाविकास आघाडीच्या पाठीशी खंबीरपणे उभारल्याने विजय निश्चित असल्याचा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

माजी मंत्री राजेश टोपे म्हणाले, अतिशय वेगाने विकसीत होणारे, उद्योगनगरी, आयटीनगरी अशी या शहराची ओळख होती. मात्र भाजपच्या काळात हे शहर अधोगतीकडे वाटचाल करत आहे. या शहरात पुन्हा विकासाचा वेग वाढवायचा असल्यास नाना काटे यांना विजयी करून अजित पवार आणि महाविकास आघाडीला साथ द्या. सध्या विचारांची लढाई सुरू आहे. छत्रपती शिवरायांनी आपल्याला स्वराज्य दिले. सर्वांना सोबत घेऊन जाण्याची शिकवण दिली. परंतू भाजपच्या काळात मनुवादी वृत्ती फोफावेतय. या वृत्तीचा बिमोड करावयाचा झाल्यास नाना काटे यांचा विजय महत्त्वाचा आहे.

भाजपकडून भ्रष्टाचाराचा कळस

भाजपचे नगरसेवक तुषार कामठे यांचा अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत पक्षप्रवेश झाला. त्यांच्यासह अन्य लोकांचाही प्रवेश करण्यात आला. यावेळी आपली भूमिका स्पष्ट करताना तुषार कामठे यांनी भाजपच्या भ्रष्टाचाराचा पाढाच वाचला. स्वतःच्याच पक्षाच्या भ्रष्ट कारभाराविरोधात आंदोलन करूनही दखल घेतली गेली नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. पुण्यात ज्या कामासाठी महापालिका चार कोटी मोजते त्याच पद्धतीच्या कामासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने ३८ कोटी रुपये मोजले आहेत. एकाच कामासाठी शंभर कोटींहून अधिक रक्कमेच्या दोन निविदा काढत भ्रष्टाचाराचा उच्चांक केल्याचे कामठे म्हणाले. भाजपने केलेल्या भ्रष्टाचाराचे अनेक पुरावे माझ्याकडे असून ते उघड करणार आहे. जनतेच्या कल्याणासाठी आणि शहराच्या विकासासाठी आपण भाजप सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केल्याचे ते म्हणाले.

आता तरी चूक दुरुस्त करा!

आपल्या मिश्किल शैलीत अजितदादा यांनी विरोधकांना बोचकारताना उपस्थितांनाही चिमटे काढले. ते म्हणाले, 'राज ठाकरे म्हणाले होते की लोकं विकासाला बघूनच मतदान करतात.. मग 2017 ला काय झालं? तो अपवाद वगळता तुम्ही मला नेहमीच साथ दिली. नानाला निवडून द्या.  आपण नानाकडून काम करवून घेऊ. अण्णा आणि नानाची जोडी सर्वांगीण विकासासाठी असेलच. मी देखील त्यांच्याकडून विकासकामे करवून घेईन. मी कामानं झपाटलेला माणूस आहे. माझ्याकडून काम करून घ्या! आहे का कुणी पहाटे 6 पासून काम करणारं?' अशा शब्दात दादांनी खंत व्यक्त करतानाच विकासकामांवर आपली भूमिका स्पष्ट केली.