सहकार वाचवण्यासाठी समित्या स्थापणार नाही ! अमित शहांनी दिला नवा कानमंत्र
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
सहकार परिषदेत बोलताना अमित शहा यांनी केंद्र सरकारतर्फे येत्या काळात सहकार चळवळ वाचवण्यासाठी कोणती रणनीती आखली जाईल, याविषयी सूतोवाच केले. ते म्हणाले, आम्ही यासाठी समित्या स्थापन करणार नाहीत तर सहकार क्षेत्राचा अनुभव असलेल्या विद्वानांसोबत काम करू. वित्त, साखर कारखाने, वितरण, मार्केटिंग, दूध इत्यादी सर्वच क्षेत्रांसाठी ही रणनीती लागू असेल.’ अमित शहा पुढे म्हणाले,
. सहकार क्षेत्रात काळानुरूप अनुकूल बनवावे लागेल.
. प्रशासनाचे, पद्धतींचे आधुनिकीकरण करावे लागेल. सर्व व्यवहार काँप्युटराइज्ड करावे लागतील.
. कर्चमाऱ्यांमध्ये प्रोफेशनल कौशल्य असणाऱ्यांना योग्य सन्मान द्यावा लागेल.
. कुशल कर्मचाऱ्यांना जे बाहेर पॅकेज उपलब्ध आहे, ते पॅकेज द्यावे लागेल.
. त्यांना सोबत घेऊन स्पर्धेत उतरवाले लागेल.
. असे केले तरच सहकाराची चळवळ 50 ते 100 वर्षे पुढे नेता येईल.
सहकार विद्यापीठाची स्थापना करणार
अमित शहा पुढे म्हणाले, देशात एक सहकार विद्यापीठाची स्थापना केली जाईल. तसेच मल्टी स्टेट कॉऑपरेटिव्ह कायदादेखील बदलणार आहोत. यासोबतच जे क्षेत्र सहकारीता क्षेत्राशी जोडलेले नाहीत, ते या चळवळीत कशा प्रकारे जोडता येतील, याचाही अभ्यास करण्यासाठी एक सचिवांची समिती काम करत आहे. येत्या काळात सहकारी नीती येईल. याद्वारे पुढील 25 वर्षे सहकारात प्राण फुंकण्याचे काम केले जाईल. देशातील ज्या ठराविक राज्यांमध्ये सहाकाराची सुरुवात झाली, त्यात महाराष्ट्राचा समावेश आहे. महाराष्ट्रातील सहकाराची ही चळवळ मजबूत आहे. तिची मूळेही खोलवर रुजलेली आहेत. पद्मश्री विखे पाटील यांच्या कर्मभूमीत आपण ही परिषद आहोत, त्यामुळे परमेश्वरही आपल्याला मदत करेल, असा मला विश्वास आहे.