आळंदीचा विकास आराखडा तयार करताना भाविकांना केंद्रस्थानी ठेवावे - उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

आळंदीचा विकास आराखडा तयार करताना भाविकांना केंद्रस्थानी ठेवावे - उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

शेगाव येथील श्री. गजानन महाराज संस्थांनचा पॅटर्न माऊलींच्या मंदिरात राबवला जावा

आळंदी  (प्रबोधन न्यूज )  -  भाविकांना केंद्रस्थानी ठेवून नियोजनबद्ध विकास आराखडा बनवावा तसेच देवस्थानच्या विकासाकरिता लागणाऱ्या निधीसाठी प्रयत्न करणार असल्याचे उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितले. सुरक्षेच्या दृष्टीने मंदिर परिसरात सुरक्षा रक्षकांसह होमागार्ड्सची नेमणूक बारा महीने असली पाहिजे. शेगाव येथील श्री. गजानन महाराज संस्थांनचा पॅटर्न माऊलींच्या मंदिरात राबवला जावा असे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले. इंद्रायणी नदीच्या स्वच्छतेसंदर्भात मुख्यमंत्र्यांशी बोलणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

अधिक श्रावण महिन्याच्या निमित्ताने श्री. क्षेत्र आळंदी येथे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधी स्थळाचे उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दर्शन घेतले. यादरम्यान त्यांनी मंदिर परिसरातील अजाण वृक्ष, माऊलींचे कुलदैवत श्री. सिद्धेश्वर मंदिराचे दर्शन त्यांनी घेतले. डॉ. गोऱ्हे यांनी ग्रंथ भांडाराला भेट देऊन माऊलींचे पुस्तक खरेदी केले. माऊलींच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या या परिसरात आल्यावर मानला समाधान वाटल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले. 

यावेळी आळंदी देवस्थानचे वतीने उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. देवस्थान समितीकडून डॉ. गोऱ्हे यांनी मंदिराच्या विकासकामांची माहिती घेतली.  

याप्रसंगी, स्त्री आधार केंद्राच्या विश्वस्त जेहलम जोशी,  सतलज दिघे - गोऱ्हे, शिवसेना महिला पदाधिकारी श्रीमती. मंगला हुंडारे, श्रीमती. संगीता फफाळ, मंदिर समिती व्यवस्थापक  ज्ञानेश्वर वीर, विशेष कार्यकारी अधिकारी  संकेत वाघमारे, माऊलीदास महाराज, शिवसेना उपजिल्हा प्रमुख  प्रकाश वाडेकर, महाराष्ट्र प्रदूषण महामंडळ सदस्य  नितीन गोरे, युवराज शिंगाडे,  राहुल चव्हाण, उपसभापती यांचे विशेष कार्यकारी अधिकारी  किरण काकडे,  अविनाश राळे,  सचिन शिंदे,  अर्जुन मेदनकर,  साईनाथ ताम्हाणे उपस्थित होते.