प्रतिभा ज्युनिअर कॉलेजचा "दशकपूर्ती सोहळा" उत्साहात साजरा

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

प्रतिभा ज्युनिअर कॉलेजचा "दशकपूर्ती सोहळा" उत्साहात साजरा


चिंचवड , (प्रबोधन न्यूज )  - चिंचवड मधील कमला शिक्षण संस्थेच्या प्रतिभा ज्युनिअर कॉलेजला दहा वर्षे पूर्ण झाली. यानिमित्त उपप्राचार्या डॉ. वनिता कुऱ्हाडे यांच्या पुढाकाराने व सांस्कृतिक विभागाच्या अंतर्गत प्रा.वर्षा निगडे व तृप्ती बजाज यांच्या सहकार्याने महाविद्यालयाचा  "दशकपूर्ती सोहळा " साजरा करण्यात आला. तसेच या कार्यक्रमामध्ये बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आणि प्राचार्य डॉ. बाबासाहेब सांगळे यांच्या निवृत्ती समारोहचे आयोजन कारण्यात आले होते. असा त्रिवेणी संगमाचा कार्यक्रम अतिशय उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमाची सुरुवात गणेश वंदना साक्षी वणवे हिच्या नृत्याने झाली. मान्यवरांचा परिचय व सत्कारानंतर सिद्धी लष्करे हिच्या गोड गायनाने कार्यमास सुरुवात झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ.राजेंद्र कांकरिया यांनी केले तर उपप्राचार्या डॉ.वनिता कुऱ्हाडे यांनी ज्युनिअर कॉलेजच्या प्रवासाचा प्रगती अहवाल यावेळी सादर केला. सन २०१३ ला लावलेला प्रतिभा जुनिअर कॉलेजचा वटवृक्ष ज्ञान आणि कलागुण घेऊन आज बहरत आहे आणि बहरत राहील असे सांगितले.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सावित्रीबाई फुले विद्यापीठ, आखिल भारतीय प्राचार्य फेडरेशनचे माजी व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. सुधाकर जाधवर यांनी आपल्या मार्गदर्शनात विद्यार्थीनी आशावादी व ध्येयवादी असावेत तसेच आयुष्यात जे आहे ते व्यवस्थित सांभाळता आले पाहिजे असे सांगून महाविद्यालयाच्या कार्याचे कौतुक केले. यानंतर डॉ. दिपक शहा यांनी आपल्या  अध्यक्षीय भाषणातून ज्यूनिअर कॉलेजच्या प्रगतीचे कौतुक करून शिक्षकांना प्रोत्साहन दिले.
          या कार्यक्रमात प्रतिभा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाबासाहेब सांगळे याना सेवानिवृत्त झाल्याबद्दल त्याचा निरोप  समारंभ म्हणून मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. प्रा.सुवर्णा गोगटे यांनी सरांच्या मानपत्राचे वाचन केले. तसेच, याप्रसंगी शारीरिक शिक्षण विभागाचे प्रा. पांडुरंग इंगळे यांचाही सेवनिवृत्तीचा सत्कार करण्यात आला. इयत्ता बारावी तील विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा म्हणून त्यांचा सत्कार करण्यात आला व महाविद्यालयातील क्रीडाक्षेत्रातील राष्ट्रीय पातळीवर विजेत्या ठरलेल्या विद्यार्थ्यंचाही सत्कार करून कौतुक करण्यात आले. त्याबरोबर  विशेष सत्कार म्हणून प्रतिभा ज्युनिअर कॉलेजच्या सर्व शिक्षक-शिक्षकेत्तोरवृंदाना सन्मानचिन्ह देऊन प्रोत्साहित करण्यात आले.
          या कार्यक्रमास संस्थेचे अनेक विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. पी.आय.बी.एम. चे  संचालक डॉ. सचिन बोरगावे, प्रतिभा शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या समन्वयिका डॉ. सुवर्णा गायकवाड, प्रतिभा स्कूल व ज्युनियर कॉलेजच्या च्या मुख्याध्यपिका सविता ट्रविस तसेच डॉ.डी. वाय पाटील कॉलेजचे प्राचार्य रणजीत पाटील उपस्थित होते. तसेच प्रतिभा ग्रुप मधील सर्व विभागातील सर्व प्राध्यापक, अध्यापक वर्ग उपस्थित होता.
       कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सुनीता पटनायक डॉ. रवींद्र निरगुडे प्रा.वैशाली देशपांडे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्राध्यापिका प्रा जस्मिन फरास यांनी केले.