न्यूज १४ मिडीया नेटवर्कचे पिंपरी चिंचवड सन्मान पुरस्कार जाहीर

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

न्यूज १४ मिडीया नेटवर्कचे पिंपरी चिंचवड सन्मान पुरस्कार जाहीर

पिंपरी-चिंचवड, दि. ६ एप्रिल – भोसरी, पिंपरी, चिंचवड, आकुर्डी आणि निगडी या पाच गावांचा समावेश असणारी पिंपरी चिंचवड नगरपालिका दिवंगत खासदार आण्णासाहेब मगर यांच्या नेतृत्वाखाली स्थापन करण्यात आली. मागील ५० वर्षात गाव खेडे ते औद्योगिक नगरी, कामगार नगरी हा नावलौकिक अभिमानाने मिरविणा-या या शहराचे नाव आता जागतिक पातळीवर स्मार्ट सिटी, मेट्रो सिटी, स्पोर्टस्‌ सिटी म्हणून पुढे येत आहे. पिंपरी चिंचवड शहराच्या विकासात येथील भूमिपूत्रांसह उद्योग, व्यवसायानिमित्त देशभरातील विविध जिल्ह्यातून आलेल्या कामगारांचे व विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या नागरिकांचे उल्लेखनीय योगदान आहे. त्यातील निवडक मान्यवरांचा योग्य सन्मान ‘न्यूज १४ मिडीया नेटवर्क’च्या वतीने गुरुवारी दिनांक ७ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता ऑटो क्लस्टर हॉल चिंचवड येथे करण्यात येणार आहे.

पद्मश्री गिरीश प्रभूणे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केलेल्या या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त राजेश पाटील आणि पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश आदी उपस्थित राहणार आहेत अशी माहिती कार्यक्रमाचे आयोजक अविनाश कांबीकर यांनी दिली आहे. यावेळी पॅरालिम्पिक जलतरण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेले पद्मश्री मुरलीकांत पेटकर यांना ‘पिंपरी चिंचवड सन्मान जीवन गौरव पुरस्कार’ देऊन गौरविण्यात येणार आहे. त्याचबरोबर ‘सन्मान कार्याचा गौरव शहराचा’ हे पुरस्कार डॉ. पं. नंदकिशोर कपोते (नृत्य), राजन लाखे (साहित्य), डॉ. संजीवकुमार पाटील (नाट्य), राजेंद्र शिंदे (चित्रपट), डॉ. नरेंद्र वैद्य (वैद्यकीय), धनंजय वर्णेकर (शैक्षणिक), मानव कांबळे (सामाजिक), संतोष बारणे (बांधकाम व्यावसायिक), अनिल सौंदडे (औदयोगिक), दिलीप सोनिगरा (सुवर्णपेढी व्यावसायिक), अनिता गोसावी (कर्तृत्ववान महिला) यांना प्रदान करण्यात येणार आहेत.
यावेळी आगळी वेगळी प्रेम कहाणी असलेल्या "लगन" या मराठी चित्रपटाचे पोस्टर अनावरण करण्यात येणार असून यावेळी ‘लगन’ कलाकारांची टीम हजर राहणार आहे. या सोबतच "पिंपरी चिंचवड सन्मान" पुरस्कार वितरण करण्यात येणार आहे अशी माहिती न्युज १४ मीडिया नेटवर्क चे संचालक अविनाश कांबीकर यांनी दिली आहे.