सौरभ कृपाल पहिले समलैंगिक जज होण्याची शक्यता ? कॉलेजियमची शिफारस

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

सौरभ कृपाल पहिले समलैंगिक जज होण्याची शक्यता ? कॉलेजियमची शिफारस

नवी दिल्ली -

भारतीय न्यायव्यवस्थेत इतिहास घडण्याची शक्यता निर्माण झालीय. कारण सुप्रीम कोर्टाच्या कॉलेजियमने ज्येष्ठ वकिल सौरभ कृपाल यांना दिल्ली हायकोर्टाचे जज बनवण्याची शिफारस केलीय. ह्या शिफारशीवर शिक्कामोर्तब झालं तर ते देशातले पहिले समलैंगिक जज होतील. फक्त न्यायव्यवस्थेसाठीच नाही तर देशासाठीही हा एक ऐतिहासिक निर्णय असेल. कारण सुप्रीम कोर्टाच्या कॉलेजियमनं एखाद्या गे व्यक्तीला जज करण्याचा पहिल्यांदाच निर्णय घेतलाय. हा निर्णय भारतीय समाज व्यवस्थेसाठीही क्रांतीकारक ठरण्याची चिन्हं आहेत.

सुप्रीम कोर्टानं जे स्टेटमेंट जारी केलंय, त्यात असं म्हटलंय की, 11 नोव्हेंबरला कॉलेजियमची बैठक झाली आणि त्यात सौरभ कृपाल यांच्या नावाची शिफारस करण्यात आली. विशेष म्हणजे माजी सरन्यायधीश एस. ए. बोबडे यांनी केंद्र सरकारकडे कृपाल यांना जज बनवण्यावर विचारणा केली होती. त्यावर केंद्रानं मत स्पष्ट करावं असही बोबडे म्हणाले होते. सौरभ कृपाल यांच्या नावाची पहिल्यांदाच शिफारस होतेय, असेही नाही. यापूर्वीही चार वेळा विचारविनिमय झाले, पण मतभेद उघड झाले. 2017 मध्ये पहिल्यांदा सौरभ कृपाल यांना जज बनवण्याची शिफारस केली गेली होती.