ज्यांच्या कॉलरला हात घालायचाय तो योग्यवेळी घालणारच - संजय राऊत
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
मुंबई, दि. १ एप्रिल - महाविकास आघाडी सरकारला ज्या राजकीय व्यक्तींच्या कॉलरला हात घालायचाय, त्यांच्या कॉलरला योग्यवेळी नक्कीच हात घातला जाईल असं वक्तव्य संजय राऊतांनी केलं आहे. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडून भाजप नेत्यांविरोधात पुरेशा तडफेने कारवाई होत नसल्यामुळं शिवसेना नाराजी असल्याची चर्चा होती. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी शुक्रवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना आगामी काळात भाजप नेत्यांवर कारवाई होईल, असे संकेत दिले आहेत.
केंद्रीय तपासयंत्रणा अतिरेकी पद्धतीनं कारवाई करतात तशा आम्ही करणार नाही. सगळं कायद्याने होणार. योग्यवेळी कायदेशीर पद्धतीने संबंधित व्यक्तींविरोधात कारवाई केली जाईल. केंद्रीय तपास यंत्रणांप्रमाणे आम्ही सूडबुद्धीने कारवाई करणार नाही, असंही संजय राऊत यांनी स्पष्ट केलंय.
ईडी अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचारासंबंधी मी काही पुरावे पंतप्रधान कार्यालयाकडे दिले आहेत. तसेच मी महाराष्ट्राच्या यंत्रणांकडे यासंदर्भात काही कागदपत्रे दिली आहेत. त्यावर लवकरच कारवाई होताना तुम्हाला दिसेल, असंही संजय राऊत यांनी सांगितलं. भाजपचे लोक रोज नावं घेतात. मात्र, मी कोणाचीही नावं घेतलेली नाहीत. पोलिसांना त्यांचा तपास पूर्ण करू द्या. शेवटी राज्य हे कायद्याने चालते, असे संजय राऊत यांनी म्हटलं आहे.