मुख्यमंत्री व गृहमंत्री यांच्या भेटीवरून उठलेल्या अफवांचं झालं निराकरण
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
मुंबई, दि. १ एप्रिल - आज सकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व गृहराज्यमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यात वर्षा निवासस्थानी सुमारे १ तास भेट झाली. या भेटीवरून माध्यमांमद्ये अनेक अफवा पसरल्या होत्या. पण आता त्याचे निराकारण झाले आहे. मुख्यमंत्री कार्यालयानेच या बाबत लगेच स्पष्टीकरण प्रसिद्धीस दिले आहे. गृहमंत्र्यांवर मुख्यमंत्री नाराज अशा बातम्या काही माध्यमांवर येत आहेत. या बातम्यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खंडन केले आहे. अशा बातम्या चुकीच्या आणि विपर्यास्त करणाऱ्या असून माझा माझ्या सहकाऱ्यांवर पूर्ण विश्वास आहे आणि ते उत्तम काम करीत आहेत असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केल्याचे जनसंपर्क खात्यानं म्हटलं आहे.
तत्पूर्वी शिवसेनेतील ज्येष्ठ नेत्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडील गृहखाते आपल्याकडे घ्यावे, असा मतप्रवाह निर्माण झाल्याची माहिती समोर आली होती. भाजप नेत्यांविरोधात पुरावे देऊनही गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील तत्परतेने कारवाई करत नाहीत, यामुळे शिवसेना नाराज आहे. त्यामुळे शिवसेनेच्या गोटात कमालीची अस्वस्थता आहे. आता भाजपला जशास तसे उत्तर देण्यासाठी गृहमंत्रालय आपल्याकडे घ्यावे, अशी मागणी शिवसेनेच्या नेत्यांमध्ये जोर धरू लागल्याचे सांगण्यात येत होते.