आमदार लक्ष्मण जगताप यांची यमराजाला धोबीपछाड; तब्येत सुधारली

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

आमदार लक्ष्मण जगताप यांची यमराजाला धोबीपछाड; तब्येत सुधारली

पिंपरी-चिंचवड, दि. 12 मे - आमदार लक्ष्मण जगताप यांची प्रकृती ठणठणीत होत असून, लवकरच पुन्हा एकदा लोकांना भेटणार आहेत. एक महिन्यापूर्वी आमदारांची प्रकृती चिंताजनक झाल्यानं त्यांना बाणेर येथील जुपिटर हॉस्पिटलमध्ये दाखल कऱण्यात आले. पहिला आठवडा ते अत्यवस्थ होते. काही काळ त्यांना व्हेंटीलेटर लावण्यात आला होता. सर्व हालचाल मंदावल्याने सर्वांच्या जीवाला घोर लागला होता. त्यांच्या उपचारासाठी एक अतिशय महत्त्वाचे इंजेक्शन अमेरिकेतून हवे होते. स्वतः अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांनी अमेरिकेतून एक अत्यंत महत्वाचे इंजेक्शन मिळविण्यासाठी अटोकाट प्रयत्न केले.

त्या इंजेक्शनचे तीन डोस दिल्यानंतर पंधरा दिवसांत भाऊंच्या तब्बेतीत लक्षणीय फरक पडला. आज सकाळी लक्ष्मण जगताप यांनी थेट हॉस्पिटलच्या चौथ्या मजल्यावरून बंद काचेच्या खिडकीतून आपल्या चाहत्यांना हात करतानाचे दृश्य व्हायरल झाले आणि सर्वांनीच सुटकेचा निःश्वास सोडला. भाऊंनी चक्क यमराजालाच धोबीपछाड दिल्याचे बोलले जात आहे.

त्यांच्या तब्येतीचे वृत्त समजताच उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभेतील विरोधी नेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेतील विरोधी नेते प्रविण दरेकर, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, रामदास आठवले, माजी मंत्री गिरीश महाजन आदींनी थेट हॉस्पिटलमध्ये जाऊन विचारपूस केली. भाऊंच्या अनेक समर्थकांनी त्यांच्या प्रकृतीसाठी मोरया गोसावी मंदिरासह अनेक ठिकाणी होमहवन, यज्ञयाग केले त्याला अखेर यश आले. तीस वर्षांच्या संघर्षमय राजकीय जीवनात भलेभले हल्ले परतवून लावणाऱ्या या योद्ध्याने जीवावर आलेले हे संकटसुध्दा परतवून लावले आहे. यमराजाशी दोन हात करुन यशस्वी मुद्रेने ते परतले आहेत.

व्हिडिओ पाहा.....