अचानक रेल्वे स्टेशनच्या टीव्ही स्क्रीनवर सुरु झाली पॉर्न क्लिप
अचानक डिस्प्ले बोर्डवर पॉर्न व्हिडीओ दिसू लागले. यानंतर स्थानकात महिला व मुलांसोबत बसलेल्या प्रवाशांची कुचंबणा झाली.
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
पाटणा - बिहारची राजधानी पाटणा येथे रविवारी रात्री उशिरा सायबर गुन्हेगारांनी पाटणा जंक्शनच्या जाहिरातींचे डिस्प्ले बोर्ड हॅक केले. रात्री साडेनऊनंतर अचानक डिस्प्ले बोर्डवर पॉर्न व्हिडीओ दिसू लागले. यानंतर स्थानकात उपस्थित प्रवाशांमध्ये गोंधळ उडाला. कुटुंबीयांसह बसलेले लोक इकडे-तिकडे तोंड फिरवून अस्वस्थ दिसत होते. सुमारे तीन मिनिटे हा अश्लील व्हिडिओ स्क्रीनवर प्रसारित करण्यात आला.
रात्री साडेनऊनंतर अश्लिल व्हिडीओ सुरू झाल्याचे स्टेशनवर उपस्थित लोकांचे म्हणणे आहे. या घटनेची माहिती स्थानक व्यवस्थापनाला समजताच, मोठा गोंधळ उडाला आणि लगेचच डिस्प्ले स्क्रीनचा सिग्नल बंद करण्यात आला. त्याचवेळी पाटणा जंक्शन येथील आरपीएफ स्टेशनमध्ये याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्टेशनच्या जंक्शनवर अचानक अश्लील व्हिडीओ चालवणे अत्यंत निष्काळजीपणाचे आहे.
कुटुंब आणि मुलांसह उपस्थित असलेल्यांसाठी हा एक विचित्र क्षण होता. आरपीएफ इन्स्पेक्टर सांगतात की, रात्री 9:56 ते 9:59 दरम्यान हा व्हिडिओ जवळपास 3 ते 4 मिनिटांपर्यंत प्ले करण्यात आला. डिस्प्ले स्क्रीनवर अश्लील व्हिडीओ चालवण्याची माहिती उपलब्ध आहे. लगेच डिस्प्ले स्क्रीन बंद केली गेली. याप्रकरणी काहीजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आणि तपास सुरू आहे.
पाटणा जंक्शनवर ट्रेनची वाट पाहणाऱ्या प्रवाशांना कुटुंबासमोर लाजिरवाणा प्रसंगाला सामोरे जावे लागले आहे. जंक्शनच्या प्लॅटफॉर्मवरील अनेक टीव्ही स्क्रीनवर अचानक जाहिरातींऐवजी अश्लील चित्रपटांचे प्रसारण सुरू झाले. लोक रेल्वेच्या व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करू लागले. अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, होळीपूर्वीही अशा प्रकारची घटना स्थानकात घडल्याने प्रवाशांना प्रचंड पेच सहन करावा लागल्याचे सांगण्यात येत आहे.