शरद पवारांमुळे अंडरवर्ल्ड पासून मुंबई वाचली – पंतप्रधान
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
मुंबई, दि. १४ मार्च – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे दाऊदचे हस्तक व पाकिस्तानचे एजंट आहेत असा आरोप वाचाळ राणे पुत्रांनी केला आहे. त्यामुळे संतप्त राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेऊन राणे बंधूंवर गुन्हा दाखल केला. एकीकडे राणेंची मुले शरद पवारांवर बेछुट आरोप करीत असताना राष्ट्रवादीचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी पंतप्रधान मोदींचा शरद पवारांसंबंधीचा व्हिडिओ आपल्या ट्विटरवर पोस्ट केला आहे. या व्हिडिओत मोदी यांनी म्हटले आहे की, मुंबईला अंडरवर्ल्डच्या तावडीतून वाचविण्यासाठी शरद पवार यांचं मोठं योगदान आणि कौशल्य आहे.
मुंबईत पाऊस जरी पडला तरी थंडी दिल्लीत वाजते असं मुंबई-दिल्लीचं नातं आहे. मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे. एक काळ एक दशक असं आलं होतं ज्यावेळी मुंबईला अंडरवर्ल्डनं काबीज केलं होतं. एक अंधार पसरला होता. मुंबई जर अंडरवर्ल्डच्या हातात गेली तर काय होईल, असं वातावरण तयार झालं होतं. पण शरद पवार यांचं कौशल्य आणि हिंमत होती की, त्यांनी अंडरवर्ल्डपासून मुंबईला वाचवलं. मुंबईला त्यातून बाहेर काढलं हे त्यांचं सामर्थ्य होतं, असं मोदींनी एका कार्यक्रमातील भाषणात म्हटलं आहे.