'झटपट प्रमोशनसाठी तुमच्यात 'असं'  टॅलेंट असायला हवं !' युजरच्या ट्विटने अमृता फडणवीस भडकल्या 

'झटपट प्रमोशनसाठी तुमच्यात 'असं'  टॅलेंट असायला हवं !' युजरच्या ट्विटने अमृता फडणवीस भडकल्या 

मुंबई, (प्रबोधन न्यूज) - नेहमी आपल्या वादग्रस्त ट्विट्सने प्रसिद्धीच्या झोतात राहणाऱ्या अमृता फडणवीस आता सोशल मीडियावर एका नेटकऱ्यानेकेलेल्या वादग्रस्त टिप्पणीमुळे चांगल्याच भडकल्या आहेत. याप्रकरणी अमृता फडणवीस यांनी थेट मुंबई पोलिसांचीच मदत मागितली आहे. अमृता यांनी या व्यक्तीविरोधात पोलिसांनी कारवाई करावी, असे आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. 

काय आहे हा ट्विट ?

 ट्विटरवरएका युजरने अमृता फडणवीस यांच्या अ‍ॅक्सिस बँकेतील नोकरीविषयी एक टिप्पणी केली होती. 'मित्रांनो,
Axis बँकेत चांगला स्कोप आहे,
तुम्ही कॅशियर म्हणून जॉईन करून
मॅनेजर अगदी व्ही पी पण होऊ शकता...
अट एकच
तुमच्यात कचकचून भरलेलं टॅलेंट असायला हवं!!!' असे अमृता यांचा की फोटो शेअर करून या ट्विटमध्ये म्हटले होते. या युजरचा रोख अमृता फडणवीस यांच्या दिशेने होता.

त्यानंतर संतापलेल्या अमृता फडणवीस यांनी ट्विट करुन आपल्या मनातील खदखद बोलून दाखविली. 'हा बघा महाविकासआघाडीच्या कार्यकर्त्यांचा उद्धटपणा. स्वत:च्या पायांवर उभे असलेल्या आणि एखाद्या संस्थेत अनेक वर्षे निष्ठेने काम करणाऱ्या महिलेला लक्ष्य केले जाते. पुरुषांशी तुलना करुन तिची बदनामी करण्याचा प्रयत्न होतो. अशाप्रकारची अनेक ट्विटस पोस्ट केली जातात. मुंबई पोलिसांनी याविरोधात कारवाई करावी. तुम्ही कोणत्याही दबावाखाली नसाल, अशी आशा करते,' असे अमृता यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.