अर्थसंकल्पात निगडीपर्यंत मेट्रो विस्तारीकरणाचा समावेश - संजोग वाघेरे‌

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

अर्थसंकल्पात निगडीपर्यंत मेट्रो विस्तारीकरणाचा समावेश - संजोग वाघेरे‌

पिंपरी चिंचवड, दि. १४ मार्च - राज्याच्या अर्थव्यवस्थेला गती देणारा कृषी, आरोग्य, मनुष्यबळ विकास, दळणवळण आणि उद्योग क्षेत्रांवर आधारित विकासाची पंचसूत्री असणारा अर्थसंकल्प शुक्रवारी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी मांडला. या पंचसुत्रीमध्ये पिंपरी-चिंचवड शहरातील पिंपरी ते निगडीपर्यत मेट्रोच्या विस्तारीकरणाला प्राधान्य देण्यात आले आहे, असे माजी महापौर संजोग वाघेरे‌ पाटील यांनी सांगितलंय.

अर्थसंकल्पासंदर्भात संजोग वाघेरे‌ पाटील म्हणाले की, अर्थसंकल्पातून शहरी व ग्रामीण विकासाबरोबर पर्यटन, आरोग्य सुधारणा करून आणि सीएनजीचे दर कमी करून नागरिकांना महागाईपासून दिलासा देण्याचं काम महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून करण्यात आले आहे. पुणे, पिंपरी चिंचवड शहर आणि जिल्ह्याच्या दळवळणाकडे लक्ष देण्यात आले आहे. प्रामुख्येने पिंपरी चिंचवड शहराशी निगडीत पिंपरी ते निगडी मेट्रो विस्तारीकरण लवकरात लवकर व्हावे. शहरवासीयांना अर्धवट मेट्रोऐवजी उपयोगी  मेट्रो सेवा उपलब्ध व्हावी. हे प्रामाणिक उदिष्ट समोर ठेवून मेट्रोच्या विस्तारीकरणावर अजितदादांनी भर आहे. मेट्रो उद्घाटनाच्या कार्यक्रमात अजितदादांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापुढे देखील पिंपरी ते निगडीसह मेट्रो विस्तारीकरणाचा मुद्दा उपस्थि केला. यासह दळवळणामध्ये पुणे रिंगरोडसाठी 1500 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
 
यासह अर्थसंकल्पात पुणे, पिंपरी-चिंचवड शहराजवळ ३०० एकर जागेमध्ये रुग्णालय, वैद्यकीय संशोधन, औषध उत्पादन, वेलनेस, फिजिओथेरपी केंद्र याचा समावेश असलेले ‘इंद्रायणी मेडिसिटी’ उभारण्यात येणार आहे. ही देशातील पहिली वैद्यकीय वसाहत ठरणार आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड शहराजवळ छत्रपती संभाजी महाराज यांचे समाधीस्थळ आहे. या ठिकाणी संभाजीराजेंचे भव्य दिव्य असे स्मारक उभारण्यासाठी तरतूद करण्यात आली आहे. अष्टविनायक मंदिरांच्या सर्वांगीण विकास आराखड्याकरीता ५० कोटी रुपये तरतूद करण्यात आली. महापुरुषांचा स्वाभिमान राखणारं आणि महाराष्ट्राच्या  विकासाला गती देणारं अंदाजपत्रक उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दिलं आहे, असे संजोग वाघेरे पाटील यांनी सांगितलंय.