सोलापुरात भोंगे आले कसे ? पोलिसांकडून चौकशी सुरू

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

सोलापुरात भोंगे आले कसे ? पोलिसांकडून चौकशी सुरू

सोलापूर, दि. २७ एप्रिल - शहरात मुंबईहून कुरियरने भोंगा आल्याचे समजताच पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. कोणत्या करियरने किती भोंगे आले, ते कोणाला वाटप करण्यात आले, याची माहिती पोलिस घेत आहेत. मोहित कंबोज यांनी मुंबईतून सोलापूरसाठी कुरिअरने 8 भोंगे पाठवले आहेत. त्यातील १ भोंगा मंदिरावर लागला आहे. आलेल्या भोंग्याचे कोणा कोणाला वाटण्यात आले, कोणत्या कुरिअरने हे भोंगे आले आहेत याची पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे.

मंगळवारी जुनी पोलिस लाइन येथे पावन मारुती मंदिरावर यातील एक भोंगा लावण्यात आला. तेथे हनुमान चालिसा लावला. त्यानंतर पोलिसांनी तेथे येऊन परवानगीची चौकशी केली. हे समजताच आमदार विजयकुमार देशमुख तेथे दाखल झाले आणि हनुमान मंदिरात दर्शन घेतले. भोंगा लावल्यानंतर पोलिसांकडून त्रास होण्याची शक्यता आहे. कोणाची तक्रार नसताना पोलिसांनी विनाकारण हनुमान भक्तांना त्रास दिल्यास आंदोलन करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला.

दरम्यान, कंबोज यांनी मागेल त्याला भोंगा देण्याची घोषणा केली आहे. सोलापुरातून मागणी झाली. त्यानुसार कुरियरने सोमवारी आठ भोंगे आल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यापैकी रेल्वे लाइन परिसरात पावन मारुती मंदिरावर जुना भोंगा काढून कंबोज यांनी पाठवलेला भोंगा लावून हनुमान चालिसा लावण्यात आला. पोलिसांना माहिती मिळताच परवानगीची मागणी करण्यात आली. त्या भागातील कार्यकर्ते किरण पवार यांनी परवानगीसाठी अर्ज करू, असे सांगितले आहे.

सर्व प्रार्थना स्थळांवर लाऊडस्पीकर लावण्यासाठी पोलिसांची परवानगी घ्यावी. नियमांचे, वेळेचे बंधन सर्वांनी पाळावे,‌ अशा सूचना फौजदार चावडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सर्व प्रार्थनास्थळ प्रमुखांना करण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक विकास देशमुख यांनी दिली. मंगळवारी एका मंदिरात हनुमान चालिसा लाऊडस्पीकरवरून लावण्यात आला होते. पोलिसांनी पाहणी करून नियमांचे पालन करण्याची सूचना दिली. लाउडस्पीकर लावण्यासाठी सर्वांनी परवानगी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले.

 भोंगे लावल्यास पोलिसांकडून हनुमान भक्तांना त्रास होण्याची शक्यता आहे. राज्य शासनाच्या निर्देशानुसार पोलिस हिंदूंना त्रास देत आहेत. नियमानुसार भोंगे लावत असताना हनुमान भक्तांना पोलिस ठाण्यात बोलावून भोंगा काढा, असे सांगण्यात येत आहे. इतर धार्मिक स्थळांवर भोंगे असताना कारवाई होत नाही. हिंदूंना त्रास दिल्यास भाजपकडून आंदोलन करण्यात येईल, असा इशारा आमदार विजयकुमार देशमुख यांनी दिला आहे.

शहरात शेळगी, रेल्वे लाइन, ७० फूट रोड, विडी घरकुलसह ग्रामीण भागात माळशिरस येथे कंबोज यांच्याकडून भोंगे आल्याचे सांगण्यात आले. मात्र याबाबत भाजपकडून अधिकृत माहिती देण्यात आली नाही. पक्षाकडे भोंगे आले नाहीत, परस्पर आले आहेत, अशी माहिती भाजप शहर सरचिटणीस रूद्रेश बोरामणी यांनी दिली आहे.