शिवसेनेचे 25 आमदार अर्थसंकल्पावर बहिष्कार टाकणार ? मविआत नाही आलबेल
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
मुंबई, दि. 7 मार्च - सरकारकडून आमदारांना दिल्या जाणाऱ्या निधी वाटपावरून शिवसेनेच्या आमदारांमध्ये तीव्र नाराजी आहे. या आमदारांचे म्हणणे आहे की, शिवसेनेच्या आमदारांना कमी निधीचे वाटप होत आहे. काँग्रेसच्या आमदारांना 900 कोटी दिले जाणार आहेत तर राष्ट्रवादीच्या आमदारांना 700 कोटी दिले जाणार आहेत. मात्र शिवसेनेच्या आमदारांना फक्त 300 कोटी दिले जाणार आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या आमदारांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. त्याचा निषेध म्हणून शिवसेनेच्या 25 आमदारांनी अधिवेशनातील अर्थसंकल्पावर बहिष्कारा टाकण्याचे ठरवले आहे. विधान भवनाच्या पायऱ्यावर बसून आपल्याच सरकारचा निषेध करणार आहेत. या पवित्र्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, शिवसेनेचे प्रकाश आंबिटकर, आशिष जयस्वाल यांच्या नेतृत्वात हे 25 आमदार मुख्यमंत्री ठाकरे यांना भेटले व त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. महाविकास आघाडी सरकार अस्तित्वात आल्यापासून शिवसेनेच्या आमदारांमध्ये निधीवाटपाबाबत कमालीची खदखद आहे. वित्त विभाग, ग्रामविकास विभाग, जलसंपदा या राष्ट्रवादीकडील खात्यांकडून निधीवाटपाबाबत दुजाभाव केला जात आहे. आम्ही त्यांच्याकडे गेलो की, राज्याचे आर्थिक परिस्थितीचे कारण देऊन हात आखडता घेतात, अशी तक्रार शिवसेनेच्या आमदारांनी केली आहे.
आता या आमदारांची समजूत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कशी काढतात हे पाहावे लागेल.