राज ठाकरे यांची औरंगाबादची सभा रद्द होणार ?
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
औरंगाबाद, दि. २६ एप्रिल – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईतील एका सभेत १ मे रोजी औरंगाबाद येथे जाहीर सभा घेणार असून, तेथे हनुमान चालिसाचे पठण करणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र औरंगाबाद पोलिसांनी त्या अगोदरच औरंगाबाद शहरात जमावबंदी आदेश लागू केल्यामुळे राज ठाकरे यांच्या सभेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
औरंगाबादमधील सभेची मनसेकडून जोरदार तयारीही केली जात आहे. मात्र, सभेची घोषणा झाल्यानंतर औरंगाबादेतील विविध पक्ष-संघटनांनी विरोध दर्शवला आहे. त्यातच आता औरंगाबाद पोलिसांनी शहरात जमावबंदी आदेश लागू केले आहेत.
औरंगाबाद पोलिसांनी मनसेच्या सभेचाही आदेशात उल्लेख केलेला आहे. मनसेकडून हनुमान चालीसा पठणाचा कार्यक्रम घेण्यात येणार असून, त्याला विविध पक्ष, संघटनांकडून विरोध होत आहे. या संघटनांकडून आंदोलनं केली जाण्याची शक्यता आहे.
संपूर्ण औरंगाबाद पोलीस आयुक्तालय हद्दीत पाच किंवा पाच पेक्षा अधिक व्यक्तींना सार्वजनिक ठिकाणी एकत्र जमण्यास, निर्दशने, धरणे, मोर्चा, मिरवणूक काढण्यास मनाई करण्याचा आदेश देत आहे. हा आदेश अत्यंविधी, विवाह समारंभ आणि कर्तव्यावरील कोणतेही पोलीस अधिकारी, कर्मचारी किंवा शासकीय कर्मचारी तसेच पोलीस उपआयुक्त, सहाय्यक पोलीस आयुक्त आणि पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांनी दिलेल्या परवानगी नुसार घेतलेल्या कार्यक्रमांना हा आदेश लागू होणार नाही, असं या आदेशात स्पष्ट करण्यात आलेलं आहे.
हा जमावबंदी आदेश औरंगाबाद पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात २५ एप्रिल २०२२ पासून ते ९ मे २०२२ च्या मध्यरात्रीपर्यंत असणार आहेत. त्यामुळे आता राज ठाकरे यांची औरंगाबादमधील सभा होणार की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
दरम्यान, राजसाहेबांची संभाजीनगरची सभा होवू नये म्हणून नादान सरकारचे किती प्रयत्न? परवानगीसाठी आडकाठी, आता जमावबंदी. इतकी का भीती? तुम्ही कितीही थांबण्याचा प्रयत्न केला तरी ही हिंदुत्वाची पर्वणी सुरुच राहणार,असा इशारा जाधव यांनी ठाकरे सरकारला दिला आहे.
मनसेने औरंगाबादच्या सभेपूर्वी एक टीझर प्रदर्शित केला आहे. या टीझरमध्ये औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर करण्यात आला आहे. तसेच चलो संभाजीनगर अशी घोषणाही मनसेने केली आहे. राज ठाकरेंच्या सभेतील काही वक्तव्यांचा वापरही या सभेत कारण्यात आला . मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ट्वीटर सोशल मीडियावर शेअर केला.