युक्रेनमध्ये प्रवासादरम्यान भारताचा झेंडा लावण्याचे दूतावासाचे आवाहन

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

युक्रेनमध्ये प्रवासादरम्यान भारताचा झेंडा लावण्याचे दूतावासाचे आवाहन

नवी दिल्ली, दि. 25 - रशिया युक्रेनमधील युद्धानंतर येथील विमान सेवा रद्द करण्यात आली आहे. दरम्यान, याचा सर्वाधिक फटका युक्रेनमध्ये वैद्याकिय शिक्षण घेणाऱ्या भारतीय विद्यार्थांना बसला आहे. विमान सेवा बंद असल्यामुळे जवळपास 18 हजारहून अधिक भारतीय नागरिक युक्रेनमध्ये अडकून पडले आहेत. 

या सर्वांना सुखरुप मायदेशी परत आणण्यासाठी भारत सरकारकडून मोठ्या हालचाली करण्यात येत आहेत. युक्रेनमधील भारतीय दुतावासाकडून युक्रेनमधील नागरिकांसाठी महत्त्वाच्या मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. हंगेरी, पोलंड, रोमानियासह अनेक देशांमार्गे युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना बाहेर काढण्यात येणार आहे.

यूक्रेनमधील भारतीय दूतावासाकडून जारी करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये जे विद्यार्थी सीमा भागाजवळ वास्तव्यास आहेत त्यांना एअरलिफ्टसाठी सर्वप्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे.

बाहेर पडताना कॉन्ट्रॅक्टरसोबत संपर्कात राहण्याच्या सूचना विद्यार्थ्यांना देण्यात आल्या आहे. सीमेकडे येताना पासपोर्ट, कॅशसह इतर गरजेच्या वस्तू सोबत ठेवण्यास सांगण्यात आले आहे. प्रवासावेळी बाहेर पडताना गाडी किंवा बसवर भारताचा झेंडा लावण्याबाबतची महत्त्वाची सूचनादेखील या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये देण्यात आली आहे. कोरोनाच्या लसीकरणाचे प्रमाणपत्रदेखील बाळगण्याच्या सूचना या मार्गदर्शक सूचनांमध्ये विद्यार्थ्यांना युक्रेनमधील भारतीय दूतावासाकडून देण्यात आला आहे.

दरम्यान रत्नागिरी जिल्ह्यातील एकूण आठ विद्यार्थी शिक्षणासाठी युक्रेनमध्ये असल्याची माहिती प्रशासनाला प्राप्त झाली आहे. हे सगळे विद्यार्थी सुखरूप असून पालकही त्यांच्या व्हिडिओ कॉल द्वारे संपर्कात आहेत अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. बी. एन.पाटील यांनी दिली.