112 कोटींचा व्हिसा घोटाळा; ७०० भारतीय मायदेशी परतले

कायम स्वरूपी नोंदणीसाठी अर्ज करताना हे प्रवेश ऑफर पत्र दाखल केल्यानंतर व्हिसासाठी दिलेले प्रवेश ऑफर पत्र बोगस असल्याचे निष्पन्न झाले.

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

112 कोटींचा व्हिसा घोटाळा; ७०० भारतीय मायदेशी परतले

नवी दिल्ली – बनावट व्हिसाच्या आधारे प्रवेश केलेल्या ७०० भारतीय विद्यार्थ्यांना कॅनडातून परत पाठवण्यात आले. यातील बहुतांश पंजाबमधील आहेत.

हाती आलेल्या माहितीनुसार या विद्यार्थ्यांनी जालंधर येथील एज्युकेशन मायग्रेशन सर्व्हिस या संस्थेतून व्हिसा मिळवले होते. ही संस्था ब्रिजेश मिश्रा चालवतात. मिश्राने व्हिसा खर्च आणि प्रवेश शुल्क म्हणून प्रती विद्यार्थी १६ लाख रुपये गोळा केले. त्यात विमानाचे भाडे व अनामत रकमेचा समावेश नव्हता.

कॅनडा प्रशासनाने स्पष्ट केले की, देशात प्रवेश करण्यासाठी या विद्यार्थ्यांनी प्रवेशाची ऑफर देणारे पत्र बनवले. मात्र विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे की, त्यांनी कॅनडात २०१८-१९ मध्ये प्रवेश केला आहे. कॅनडात विद्यार्थी व्हिसा घोटाळा व्यापक प्रमाणात उघड होण्याची ही पहिलीच वेळ आहे.

कायम स्वरूपी नोंदणीसाठी अर्ज करताना हे प्रवेश ऑफर पत्र दाखल केल्यानंतर व्हिसासाठी दिलेले प्रवेश ऑफर पत्र बोगस असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर कॅनडा प्रशासनाने या विद्यार्थ्यांना देश सोडण्याचे आदेश दिले.

हे सर्व विद्यार्थी 2018-19 मध्ये कॅनडामध्ये शिक्षणासाठी गेले होते. या विद्यार्थ्यांनी कॅनडामध्ये परमनंट रेसिडेन्सीसाठी अर्ज केला तेव्हा ही फसवणूक उघडकीस आली. यावेळी 'एज्युकेशन ऑफर लेटर्स' तपासणी करण्यात आली. यामध्ये इमिग्रेशन अधिकाऱ्यांकडून विद्यार्थ्यांना कोणत्या कागदपत्रांच्या आधारे व्हिसा जारी केला याची तपासणी केली गेली. इमिग्रेशन अधिकार्‍यांनी प्रक्रियेदरम्यान महाविद्यालयाच्या प्रवेशपत्रांची सत्यता तपासली आणि ते प्रवेशपत्र बनावट असल्याचं आढळलं.

बहुतेक विद्यार्थ्यांचं शिक्षण पूर्ण

तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, यापैकी बहुतेक विद्यार्थ्यांचं शिक्षण पूर्ण झालं आहे आणि त्यांनी वर्क परमिट मिळवलं आहे. तसेच त्यांनी कामाचा अनुभव देखील मिळवला आहे. पीआरसाठी अर्ज केला तेव्हा ही फसवणूक उघडकीस आली. अशा प्रकारची घटना कॅनडामध्ये पहिल्यांदाच समोर आली आहे. कॅनडामधील अर्जदारांची संख्या मोठी असल्यामुळे एवढी मोठी फसवणूक झाल्याचं तज्ज्ञांनी सांगितलं आहे.