लष्कराची गुप्त माहिती पाकिस्तानला पुरविली; एका जवानाला अटक
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
जोधपूर, दि. 26 मे - पाकिस्तानच्या आयएसआय एजंटला लष्कराची गुप्त माहिती दिल्याप्रकरणी लष्कराच्या एका जवानाला अटक करण्यात आली आहे. गुप्तचरांच्या चौकशीदरम्यान लष्कराच्या जवानाने अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. इंटेलिजन्सच्या तपासात आणि चौकशीत हनीट्रॅपमध्ये अडकलेल्या पाकिस्तानी एजंटचे काही व्हिडिओ सापडले आहेत. पाकिस्तानी एजंट बॉलीवूड गाण्यांवर रील बनवून लष्कराच्या जवानांना गोवतो, असे तपासात समोर आले आहे.
अटक करण्यात आलेला प्रदीप कुमार (वय 24) मूळचा रूरकी, उत्तराखंडचा आहे. तो तीन वर्षे जोधपूरमध्ये तैनात होता. नोव्हेंबर 2021 मध्ये, एका पाकिस्तानी महिला एजंटने प्रथम प्रदीप या लष्करी जवानाशी संपर्क केला. तेव्हापासून तो तिच्या जाळ्यात अडकला. प्रदीपसह अनेक लष्करी जवान पाकिस्तानी महिला एजंटच्या निशाण्यावर होते. सुंदर दिसणारी ही महिला एजंट सोशल मीडियावर अनेक प्रकारचे रील बनवत असे. ती बॉलीवूडच्या गाण्यांवर बनवलेली रील लष्कराच्या जवानाला पाठवायची, जेणेकरून तो सहज तिच्यावर विश्वास ठेवू शकेल आणि जाळ्यात येईल.
छोट्या व्हिडीओच्या माध्यमातून ती प्रत्येक सुख-दु:खात तिच्यासोबत असल्याची ग्वाही देते. अशा गोष्टी आणि व्हिडिओच्या माध्यमातून प्रदीपही अडकला. पाकिस्तानी एजंटने सांगितल्याप्रमाणे तो करत गेला आणि या जवानाला महिलेशी लग्न करण्याचे स्वप्न पडू लागले.
महिला गुप्तहेराच्या कॉलमध्ये तो इतका अडकला की त्याने डॉक्युमेंट शेअर करायला सांगताच जवान ते करत राहिला. या पाकिस्तानी महिला एजंटने प्रदीप कुमारशी लग्न करण्याचे आश्वासनही दिले होते. दोघेही व्हिडिओ कॉलवर बोलत असत. त्याचवेळी त्यांनी दिल्लीतही भेटण्याचे आश्वासन दिले होते. एका फोनवरून सुरू झालेली मैत्री पाकिस्तानी महिला एजंटच्या प्रेमात गेली. हनीट्रॅपमध्ये अडकवण्यासाठी पाकिस्तानी महिला एजंट व्हिडिओ कॉलवर अश्लील कृत्ये करत असे.