भाजपला खिंडार पडून राष्ट्रवादीमध्ये होणार मेगा भरती - योगेश बहल
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
भरतीचे सोडा, भाजपमधील गळती रोखा - योगेश बहल
पिंपरी, दि. 21 (प्रतिनिधी) - राष्ट्रवादी पक्षाला सोडचिठ्ठी देऊन पाच वर्षांपूर्वी भाजपमध्ये सामील झालेल्या नगरसेवकांचा पुरता भ्रमनिरास झाला आहे. भाजपमधील एकाधिकारशाहीला तसेच भ्रष्टाचाराने भाजपने कळस गाठल्याचे पाहून वैतागलेल्या व पस्तावलेल्या नगरसेवकांची मोठ्या प्रमाणावर घरवापसी होण्याचे संकेत मिळत आहे. जनतेलाही भाजपचा दुटप्पी चेहरा आता नकोसा झाला आहे. त्याचे खापर आपल्या माथ्यावर मारले जाऊ नये म्हणून अनेक नगरसेवकांनी भाजपला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्धार केला आहे.
महापौर नामदेव ढाके यांनी राष्ट्रवादीचे दहा नगरसेवक भाजपमध्ये येण्यास इच्छुक असल्याचे सांगितले होते. त्याला उत्तर देताना राष्ट्रवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी महापौर योगेश बहल यांनी ढाके यांना चांगलाच टोला लगावला आहे. ते म्हणाले की, गेल्या पाच वर्षांत भाजपने केलेल्या प्रचंड भ्रष्टाचारामुळे अनेक नगरसेवक नाराज झाले आहेत. रोजच एकजण राजीनामा देत असून राष्ट्रवादीमध्ये येण्यास अनेकजण इच्छुक आहेत. राष्ट्रवादीतून एकही नगरसेवक बाहेर पडणार नसून भाजपाचे 25 हून अधिक नगरसेवक राष्ट्रवादीमध्ये येण्यासाठी रांगेत उभे आहेत. त्यामुळे भाजपाच्या नेत्यांनी आता पक्षात भरती होईल हे विसरून जावे आणि आपल्या पक्षातून होत असलेली गळती रोखावी, असा टोला लगावला आहे.
याबाबत योगेश बहल यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, भाजपाने गेल्या पाच वर्षांत आपल्या सत्ताकाळात अनेक गैरप्रकार केले. करोनासारख्या महामारीचा फायदा उठवत ‘मृतांच्या टाळूवरील लोणी’ ओरबडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे या पक्षाची खरी प्रतिमा जनतेसमोर आली आहे. यांचे कर्तृत्त्व शहरातील जनेतेने पाहिले आहे. लाचखोरी, खंडणी, जमीनी बळकाविणे, भ्रष्टाचार करणे असे एक ना अनेक प्रकार आपल्या सत्तेच्या काळात भाजपाच्या नगरसेवक व पदाधिकार्यांनी केल्यामुळे महापालिकेचीही पुरती बदनामी झाली आहे.
त्यामुळे भाजपाचे 25 हून अधिक नगरसेवक राष्ट्रवादीमध्ये येण्यास इच्छुक आहेत. वसंत बोराटे यांच्यानंतर आज चंदा लोखंडे यांनी राजीनामा दिला आहे. पुढील आठ ते दहा दिवसांत अनेकजण भाजपा सोडून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत. येत्या निवडणुकीत विकासकामांच्या जोरावर पुन्हा राष्ट्रवादीची सत्ता महापालिकेत येईल. त्यामुळे महापालिकेमध्ये यापुढे भाजपाची सत्ता येणार नाही हे सर्वांनाच माहिती झाले आहे. भाजपामध्ये जाऊन कोणीही राजकीय आत्महत्या करणार नाही. मात्र ‘खोट बोल पण रेटून बोल’ या प्रवृत्तीतून नामदेव ढाके हे जनतेमध्ये गैरसमज पसरवित आहेत. त्यांच्या अशा खोटारड्या वक्तव्याला आता शहरातील जनता बळी पडणार नाही. त्यामुळे ढाके यांनी पहिल्यांदा आपल्या पक्षातील गळती रोखावी आणि त्यानंतरच भरतीची दिवास्वप्ने पहावीत, असा टोलाही बहल यांनी लगाविला आहे.