पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासनाकडून मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करा - धम्मराज साळवे

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासनाकडून मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करा - धम्मराज साळवे
पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासनाकडून मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करा - धम्मराज साळवे


     पिंपरी, (प्रबोधन न्यूज)  -  पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासनाकडून मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करा,  एम आय एमचे शहराध्यक्ष धम्मराज साळवे यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.

निवेदनात  म्हटले आहे की,पिंपरी चिंचवड शहरात मोकाट कुत्र्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे.पिंपरी चिंचवड शहरातील ज्येष्ठ नागरिक, महिला,तरुण,लहान बालके यांच्यावर भटक्या कुत्र्यांचे हल्ला करण्याचे प्रमाण वाढले आहे.भोसरी येथे एका लहान बालकावर भटक्या कुत्र्याने हल्ला केल्याने पुन्हा एकदा शहरात भटक्या कुत्र्यांचा मुद्दा उपस्थित झाला आहे.
        भटकी कुत्री शहरात मोठ्या प्रमाणात असून यांच्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात धोका निर्माण झाला आहे.अनेक वेळा ही भटकी कुत्री रोडवर  फिरतात त्यामुळे अनेक मोठे अपघात शहरात घडलेले आहेत.रात्रीच्या वेळी कुत्रे अंगावर आल्याने दुचाकीस्वार गाडी जोरात पळवतात त्यामुळे अपघात होत आहेत.
            अनेक भटक्या कुत्र्यांना वेगवेगळे आजार असतात तसेच अनेक कुत्री ही पिसाळलेली असतात जर ही कुत्री लहान मुले,नागरिक यांना चावली तर यातून एखाद्याचा मृत्यू होऊ शकतो किंवा या रोगीट कुत्र्यांमुळे विविध आजारांची निर्मिती होऊ शकते
      पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाकडून मोकाट कुत्रे पकडण्याचा ठेका देण्यात येतो महापालिका त्यावर कोट्यवधी रुपये खर्च देखील करते परंतु पशुवैद्यकीय विभाग यांच्याकडून कोणतीही ठोस कारवाई होताना दिसून येत नाही.पशुवैद्यकीय विभाग आपल्या कामात कुचराई करत आहे या विभागच्या कामचुकारपणामुळे नागरिकांचे जीविताला धोका निर्माण होत आहे.
     तरी पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासनाने तात्काळ उपाययोजना करून यावर कायमचा तोडगा काढला पाहिजे, असे निवेदनात म्हटले आहे .