पिंपरी-चिंचवडच्या कोरोना मृत्यूच्या आकडेवारीत प्रशासनाची 'अशी ही बनवाबनवी?'सात दिवसांपासून कोरोना बळींचा  'पन्नासच्या पुढे आणि साठच्या आत' आकडा ! 

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

पिंपरी-चिंचवडच्या कोरोना मृत्यूच्या आकडेवारीत प्रशासनाची 'अशी ही बनवाबनवी?'सात दिवसांपासून कोरोना बळींचा  'पन्नासच्या पुढे आणि साठच्या आत' आकडा ! 

पिंपरी, (प्रबोधन न्यूज) - राज्यभर वेगाने पसरणाऱ्या कोरोनाने पिंपरी-चिंचवड शहरालाही घट्ट विळखा घालण्यास सुरुवात केली असून दररोजच्या कोरोनाबळींचे आकडे धडकी भरविणार आहेत. असे असताना महापालिका प्रशासनाकडून मात्र कोरोनाबळींची आकडेवारी देताना 'अशी ही बनवाबनवी' सुरू आहे की काय, अशी शंका कुणालाही यावी. आरं गेल्या आठवड्याभराचा कोरोनामृतांचा आकडा  'पन्नासच्या पुढे आणि साठच्या आत' एवढाच येत असून याला प्रशासनाचा आळशीपणा म्हणावा की बेपर्वाई ? असा प्रश्न निर्माण झाला आहे. 

फेब्रुवारी 2021 च्या मध्यापासून शहरात करोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. मार्चच्या मध्यापासून शहरात करोना रुग्णांची दैनंदिन दोन हजारांहून अधिक संख्या वाढत आहे. तर गंभीर रुग्णांमध्येही मोठी वाढ झाली आहे. सध्या शहरात 25 हजार 566 सक्रीय रुग्ण आहेत. त्यामध्ये शहरातील रुग्णांची संख्या 23 हजार 602 इतकी असून शहराबाहेरील 1964 नागरिक महापालिकेच्या विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत. शहरातील एकुण रुग्णांपैकी 15 हजार 348 इतके रुग्ण गृह विलगीकरणात आहेत. तर 8 हजार 254 रुग्णांवर महापालिकेच्या विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत.

महापालिकेच्या वतीने प्रसिद्धी पत्रकाद्वारे नव्याने बाधित, करोनामुक्त आणि करोनामुळे मृत्यू झालेल्यांची आकडेवारी रोज प्रसिद्ध करण्यात येते. या आकडेवारीनुसार गेल्या सात दिवसांत म्हणजेच 16 एप्रिल ते 22 एप्रिल या कालावधीदरम्यान शहरात रोजच 54 मृत्यू होत असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. केवळ 21 एप्रिल रोजी एका अंकाने आकडेवारीमध्ये बदल करण्यात आला आहे. 16 ते 22 एप्रिल दरम्यान रोजच शहरातील 32 रुग्णांचा मृत्यू झाल्याचे दर्शविण्यात आले आहे तर याच कालावधीत शहराबाहेरील 22 रुग्णांचा दैनंदिन मृत्यू झाल्याचे म्हटले आहे. 21 एप्रिल रोजी शहराबाहेरील 23 रुग्णांचा मृत्यू झाल्याचे म्हटले आहे.
प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आलेल्या माहितीबाबत प्रशासनाला गांभिर्य नाही, केवळ कॉपी पेस्टचे प्रसिद्धीपत्रक काढण्यात येते की मृत्यूची आकडेवारी लपविली जाते? असा प्रश्न यामुळे समोर आला आहे. कोरोनामुळे अत्यंत गंभीर परिस्थिती निर्माण झालेली असताना अद्यापही प्रशासनाला गांभिर्यच नसल्याचेही समोर आले आहे.

बैठकांचाही बनाव?

महापालिकेमध्ये सध्या बैठकांचे सत्र सुरू असल्याचे भासविण्यात येत आहे. कोणत्याही माहितीसाठी कोणालाही फोन केल्यास आयुक्तांकडे मिटींग सुरू आहे एवढेच 'पढवलेले' उत्तर दिले जात आहे. महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयाचे अधिष्ठाता राजेंद्र वाबळे हे कोणाचेच फोन घेऊन माहिती देत नसल्याचे सांगण्यात येत आहे. गेल्या दोन महिन्यांपासून शहरात गंभीर परिस्थिती असताना महापालिकेचे अधिकारी इतके उदासिन कसे वागू शकतात? असा प्रश्न शहरातील प्रत्येक सुजाण आणि संवेदनशील नागरिकाला पडला आहे. 

16 ते 22 एप्रिल दरम्यान मयतांची आकडेवारी

दिनांक     शहर   बाहेरील  एकुण
16 एप्रिल -  32      22         54
17 एप्रिल -  32      22         54
18 एप्रिल -  31      22         53
19 एप्रिल -  32      22         54
20 एप्रिल -  32      22         54
21 एप्रिल -  32      23         55
22 एप्रिल -  32      22         54