विधानसभा अध्यक्षपदासाठी राजन साळवी विरुद्ध राहुल नार्वेकर यांच्यात लढत होणार

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

विधानसभा अध्यक्षपदासाठी राजन साळवी विरुद्ध राहुल नार्वेकर यांच्यात लढत होणार

मुंबई, (प्रबोधन न्यूज) - राज्याच्या विधानसभा अध्यपदासाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज अखेरचा दिवस आहे. महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे उपनेते व राजापूरचे आमदार राजन साळवी यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांच्या उमेदवारीला महा विकास आघाडीकडून मान्यता मिळेल असे सांगण्यात येत आहे. तत्पूर्वी महाविकास आघाडीत अध्यक्षपदावरून मतभेद असल्याचे समोर आले होते. साळवी यांच्या व्यतिरिक्त आणखी दोन अर्ज भरणार असल्याचे काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले होते. त्यानंतर लगेचच बाळासाहेब थोरात यांनी महाविकास आघाडीकडून एकच अर्ज देणार असल्याचे सांगितले. त्यामुळे महाविकास आघाडीत बिघाडी झाली की काय असे वातावरण तयार झाले होते.

उद्या 3 जुलै रोजी राज्य विधानसभेचे दोनदिवसीय विशेष अधिवेशन सुरू होत आहे. याच दिवशी विधानसभा अध्यक्ष निवडले जातील. त्यामुळे आज सकाळी साडे अकराच्या सुमारास रत्नागिरीतील राजापुरी येथील शिवसेनेचे आमदार व एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर सेनेचे उपनेते झालेले राजन साळवी यांनी अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला.

राजन साळवी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर माध्यमांशी बोलताना मविआकडून साळवी यांचा उमेदवारी अर्ज भरल्याचे नाना पटोले यांनी सांगितले. त्यामुळे भाजपचे उमेदवार राहुल नार्वेकरांविरोधात साळवी यांची थेट लढत होईल, असे चित्र निर्माण झाले होते. मात्र, मविआकडून आणखी दोन अर्ज दाखल केले जाणार असल्याचे नाना पटोले यांनी सांगितले. तसेच, सायंकाळपर्यंत यातील एक अर्ज कायम ठेवू व बाकीचे मागे घेऊ, असेही त्यांनी स्पष्ट केले.

नाना पटोले यांनी मविआकडून आणखी उमेदवारी अर्ज दाखल केले जाणार असल्याचे सांगितल्यानंतर काही वेळाने माध्यमांशी बोलताना काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी मविआकडून एकच उमेदवारी अर्ज भरणार असल्याचे सांगितले. नाना पटोले यांच्या वक्तव्याबद्दल विचारले असता याबाबत आमची चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेकडून यावर अद्याप प्रतिक्रिया आलेली नाही. त्यामुळे विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी मविआचा एकच उमेदवार असणार की आणखी काही अर्ज दाखल होणार, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.

काल राहुल नार्वेकर यांनी भाजपकडून अर्ज दाखल केला होता. विधानसभा अध्यक्ष निवडणुकीसाठी राहुल नार्वेकर विरुद्ध राजन साळवी असा सामना होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. शिंदे सरकारची बहुमत चाचणी आणि विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक यासाठी ३ आणि ४ जुलै रोजी विशेष अधिवेशन होणार आहे. ३ जुलै रोजी पहिल्याच दिवशी अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. भाजपकडून कुलाब्याचे तरुण आमदार राहुल नार्वेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

भाजपचे १०६ आणि शिंदे गटाचे ५० आमदार यामुळे नार्वेकरांचा विषय सोपा मानला जात आहे. राहुल नार्वेकर हे सध्या केवळ ४५ वर्षांचे असून अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर ते विधानसभेचे आजवरचे सर्वात तरूण अध्यक्ष असतील. शिवाय ते निष्णात वकील देखील मानले जातात.

या सोबतच नार्वेकर विजयी झाल्यास सासरे विधानपरिषदेचे सभापती अन् जावई विधानसभेचे अध्यक्ष असे चित्र निर्माण होणार आहे. नार्वेकर हे विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे जावई आहेत. नार्वेकरांचे बंधू अ‍ॅड. मकरंद नार्वेकर हे कुलाब्यातूनच भाजपचे नगरसेवक होते.