रोटरी क्लब, निगडीच्या पुढाकाराने मोफत नवजात शिशु अतिदक्षता विभाग सुरू

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

रोटरी क्लब, निगडीच्या पुढाकाराने मोफत नवजात शिशु अतिदक्षता विभाग सुरू

पिंपरी, (प्रबोधन न्यूज) - रोटरी क्लब ऑफ निगडी आणि त्याचे सीएसआर भागीदार एटीएस कन्व्हेयर्स यांच्या सहकार्याने आकुर्डी येथील मनपाच्या हॉस्पिटलमध्ये मोफत नवजात शिशु अतिदक्षता विभाग सेवा सुरू करण्यात आला आहे. या विभागाचे उद्घाटन एटीएसचे  व्यवस्थापकीय संचालक इव रायफेल यांच्या हस्ते करण्यात आले.

रोटरी क्लब ऑफ निगडीला एटीएस कंपनीने सीएसआर फंडातून वॉर्मर्स, फोटोथेरपी मशीन, कार्डियाक मॉनिटर्स, सिरिंज पंप आणि युनिट उभारण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व उपयुक्त वस्तूंची व्यवस्था करून दिली. यामुळे शहरातील गोरगरिबांना याचा फायदा होणार आहे.

आकुर्डी रूग्णालयात दर महिन्याला सुमारे 100-140 प्रसुती होत आहेत. हे सर्व गरीब वर्गातून येतात, त्यांना याचा फायदा होत आहे. ही सुविधा खूप महाग असते आणि नवजात मुलांची त्यांच्या आयुष्याच्या पहिल्या काही महत्त्वाच्या तासांमध्ये अत्यंत काळजी घेणे आवश्यक असते.

रोटरी क्लब आणि एटीएसला हे सुसज्ज जीव वाचवणारे एनआयसीयू हॉस्पिटलला सुपूर्द केले आहे. इव रायफेल रिफेल, निगडी क्लबचे माजी  अध्यक्ष जगमोहन भुर्जी यांच्यासह अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते.

राकेश सिंघानिया आणि श्रीकृष्ण करकरे, सेवा संचालक अंकाजी पाटील आणि डॉ. रवींद्र कदम, अध्यक्ष प्रणिता आलुरकर आणि सचिव केशव मानगे आणि ज्येष्ठ रो. अनिल कुलकर्णी, रवी राजापूरकर, राणू सिंघानिया, डॉ. रंजना कदम, अजित कोठारी, जयंत येवले, सोनाली जयंत, संजीव अलूरकर, मुख्य वैद्यकीय अधिकारी पीसीएमसी डॉ. लक्ष्मण गोफणे , डॉ. आकुर्डी रुग्णालयाचे मुख्य प्रशासकीय वैद्यकीय अधिकारी होडगर, कालिदास ढगे, डॉ. श्रीकांत चौधरी, मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. तायडे यांच्यासह इतर अनेक रोटरी सदस्य आणि एटीएसचे अधिकारी उपस्थित होते.

रोटरी क्लब ऑफ निगडी पीसीएमसी आणि पुणे कॉर्पोरेट्ससाठी त्यांचे सीएसआर प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठी पसंतीचे भागीदार आहे.