मल्याळी अभिनेत्रीवर धावत्या गाडीत लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी उच्च न्यायालयाने स्वीकारली राज्य सरकारची याचिका
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
या प्रकरणामध्ये दाक्षिणात्य चित्रपटांमधील मोठं नाव असणाऱ्या गोपालकृष्णन् पद्मनाभ म्हणजेच दिलीप नावाने ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्याचं नाव आरोपी म्हणून असल्याने त्याच्या अडचणी वाढण्याची चिन्हं दिसत आहेत. केरळ उच्च न्यायालयाने ही यचिका स्वीकारल्याने आता या प्रकरणाकडे देशभरातील प्रसारमाध्यमांचं लक्ष वेधलं गेलं आहे.
सन २०१७ साली अभिनेत्री भावना सोबत धावत्या गाडीमध्ये लैंगिक अत्याचार करण्यात आल्याच्या घटनेमुळे दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमध्ये खळबळ उडवून दिली होती. या प्रकरणामध्ये केरळ पोलिसांची गुन्हे शाखा अजूनही तपास करत आहे. याच तपास संदर्भात सध्या नवे नवे खुलासे होताना दिसत आहेत. मागील आठवड्यामध्ये राज्यातील पोलीस विभागाने या प्रकरणामध्ये अभिनेता दिलीप आणि पाच लोकांविरोधात नव्याने गुन्हा दाखल केला. दिलीप आणि इतर लोकांनी या प्रकरणाचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांना धमकावल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. काही काळापूर्वीच निर्देशक बालचंद्र कुमार यांनी लैंगिक अत्याचारांच्या घटनांसदर्भात धक्कादायक खुलासे केल्यानंतर आता हे पाच वर्षांपूर्वीचं प्रकरण पुन्हा नव्याने चर्चेत आलंय.
१७ फेब्रुवारी २०१७ रोजी मल्याळी अभिनेत्री चित्रिकरणावरुन घरी येत असताना काही लोकांनी रस्त्यामध्येच तिचं अपहरण केलं. त्यानंतर तिचा लैंगिक छळ करण्यात आला. या सर्व प्रकरणामध्ये अभिनेता दिलीपचा हात असल्याचा दावा केला जातोय. भावनाने मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिल्यानंतर राज्य सरकारने या प्रकरणामध्ये याचिका दाखल केलीय.
पाच वर्षांपासून या प्रकरणाबद्दल कुठेही वाच्यता न करणाऱ्या भावनाने आता या प्रकरणाबद्दल धक्कादायक दावे केलेत. एक नोट शेअऱ करत भावनाने मागील बऱ्याच काळापासून आपण या तणावाखाली जगत होते. मला हिणवण्याची आणि शांत राहण्यासाठी अनेक प्रलोभनं दाखवण्यात आली, अनेक प्रयत्न करण्यात आले. मात्र यामध्ये आपली काही चूक नसताना आपण बोलण्याचा निर्णय घेतल्याचं अभिनेत्रीने सांगितलं आहे. भावनाने या प्रकरणाचा खुलासा केल्यानंतर तिला अनेक सेलिब्रिटींपासून ते चाहत्यांपर्यंत सर्वांनीच पाठिंबा दिल्याचं चित्र पहायला मिळत आहे.