नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांचाही विचार करा ! - खा. शरद पवारांचा मुख्यमंत्र्यांना सल्ला 

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांचाही विचार करा ! - खा. शरद पवारांचा मुख्यमंत्र्यांना सल्ला 
मुंबई - 
राज्यातील शेतकऱ्यांचं सप्टेंबर 2019 पर्यंतचं दोन लाख रुपयांचं कर्ज माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांचाही विचार करायला हवा, असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याना दिला. राज्य सरकारची आर्थिक परिस्थिती नसेल तर कर्ज काढून या उर्वरीत शेतकऱ्यांना मदत करावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. 

महाविकास आघाडी सरकारची स्थापना होताच ठाकरे सरकारने महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेतून शेतकऱ्यांची कर्जमाफी केली होती. मात्र मधल्या काळात करोनामुळे कर्जमाफीची प्रक्रिया ही रखडलेली होती. आता पुन्हा कर्जमाफीच्या अनुशंगाने राज्य सरकारने पावले उचलले आहे. याकरिताच आधार प्रमाणीकरण करुन घेण्याचे अवाहन करण्यात आले आहे. त्यामुळे उर्वरीत शेतकऱ्यांना देखील याचा लाभ लवकरच मिळणार आहे.

ज्या शेतकऱ्यांकडे 2 लाखापर्यंतचे कर्ज आहे त्यांचे संपूर्ण कर्ज या कर्जमाफीच्या योजनेत निकाली निघाले. मात्र, करोनामुळे काही शेतकऱ्यांची प्रक्रिया अपूर्ण राहिली होती शिवाय राज्य सरकारच्या तिजोरीमध्येही खडखडाट होता. आता सर्वकाही सुरळीत सुरु झाले आहे. दरम्यान, या योजनेच्या घोषणेदरम्यान ठाकरे सरकारने नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांची मदत केली जाणार असल्याचे सांगितले होते. मात्र, अद्यापपर्यंत त्याची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील कार्यकर्ता आणि पदाधिकारी बैठकीत बोलत असताना शरद पवार यांनी ही आठवण ठाकरे सरकारला करुन दिलेली आहे.

खा. शरद पवार म्हणाले, शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. कर्जाच्या मूळ रकमेत माफी झाली. पण त्याशिवाय वेळेवर पैसे भरले त्यांना मदत करण्याचाही निर्णय घेतला होता. त्याचा काही भाग अद्यापही बाकी आहे. म्हणून राज्य सरकारशी बोलून त्याचाही निकाल घ्यावा लागेल. प्रसंगी सरकारला कर्ज काढण्याची विनंती करू. पण शेतकऱ्याच्या डोक्यावरील कर्जाच्या माफीचा निर्णय किमान 1 वर्षात 2 टप्प्यात करा, असा सल्ला पवार यांनी दिला आहे.