समुद्रकिनाऱ्यावर 'या' माशाची दहशत ! हल्ल्यात ४ जणांचा मृत्यू, लोकांमध्ये भीती

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

समुद्रकिनाऱ्यावर 'या' माशाची दहशत ! हल्ल्यात ४ जणांचा मृत्यू, लोकांमध्ये भीती

नवी दिल्ली -

जगात असे अनेक मासे आहेत जे अतिशय धोकादायक आहेत. हे मासे कोणत्याही माणसाला मारू शकतात. आता असेच एक प्रकरण दक्षिण अमेरिकन देश पॅराग्वेमध्ये समोर आले आहे. येथे पिरान्हा माशांनी मानवावर हल्ला केला असून यामध्ये आतापर्यंत चार जणांचा मृत्यू झाला आहे. यासोबतच या हल्ल्यात 20 जण जखमी झाले आहेत. या धोकादायक माशाच्या हल्ल्यानंतर आजूबाजूचे लोक भयभीत झाले आहेत.

एका मीडिया रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे की, 22 वर्षीय मुलगा बेपत्ता झाला होता, त्यानंतर कुटुंबीयांनी समुद्रकिनाऱ्यावर त्याचा खूप शोध घेतला, मात्र तो कुठेच सापडला नाही. यानंतर कुटुंबीयांनी तरुण बेपत्ता झाल्याची माहिती पोलिसांना दिली. यानंतर समुद्रकिनाऱ्याजवळ युवकाचा मृतदेह सापडला. हा मुलगा पॅराग्वे नदीत आंघोळीसाठी गेला होता, त्यावेळी त्याच्यावर हल्ला झाला.

युवकाचा मृतदेह सापडल्यानंतर, फॉरेन्सिक तपासणी करण्यात आली, ज्यामध्ये पिरान्हा माशाने युवकावर हल्ला केल्याचे स्पष्ट  झाले, ज्यात त्याचा मृत्यू झाला. पिरान्हा मासा आक्रमक होणे क्वचितच घडते. मात्र, यापूर्वीही अशा अनेक घटना या परिसरात घडल्या आहेत.

यापूर्वी, चाव्याच्या खुणा असलेल्या 49 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह पॅराग्वे नदीत सापडला होता, तर तेबिक्विरी नदीजवळ अशाच अवस्थेत दोन जणांचा मृतदेह आढळून आला होता. आता या घटनेनंतर इटापुआ येथील एका क्लबच्या व्यवस्थापकाचे म्हणणे आहे की, पिरान्हा माशांना लोकांपासून दूर ठेवण्यासाठी रसायनांचा विचार केला जात आहे.

हल्ला केव्हा होतो ते जाणून घ्या
जीवशास्त्रज्ञ ज्युलिओ झेवियर म्हणतात की पिरान्हा मासे त्यांच्या प्रजननाच्या वेळी हल्ला करतात. नर पिरान्हा बहुतेक वेळा हल्ला करतात आणि हल्ला करण्यापूर्वी ते लपतात.