चार मंत्री युद्धजन्य युक्रेनच्या शेजारील युरोपीयन देशांमध्ये जाणार 

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

चार मंत्री युद्धजन्य युक्रेनच्या शेजारील युरोपीयन देशांमध्ये जाणार 

बचावाच्या कामावर राजकारण न करण्याचे माजी पंतप्रधान देवेगौडा यांचे आवाहन

ठाणे जिल्ह्यातील ५६ विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले

 

नवी दिल्ली, दि. 28 - रशिया आणि युक्रेनमधील युद्ध परिस्थितीमुळे हजारो भारतीय नागरिक युद्धजन्य भागात अडकले आहेत. या पार्श्वभूमीवर सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. चार मंत्री थेट युद्धजन्य युक्रेनच्या शेजारी युरोपीयन देशांमध्ये जाणार आहेत. या सर्व मंत्र्यांवर विद्यार्थ्यांना सुरक्षित मायदेशी आणण्याच्या मोहिमेत समन्वयक म्हणून नेमण्यात आलंय. हे मंत्री भारतीय विद्यार्थ्यांना भारतात आणण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या मंत्र्यांसह वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. यात त्यांनी रशिया-युक्रेन युद्धाची स्थिती आणि युक्रेन सोडून मायदेशी परतणाऱ्या भारतीय नागरिकांच्या सुरक्षेवर चर्चा केली.

माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांनी बचावाच्या कामावर राजकारण नको, मोहीम राबवणाऱ्यांचं मनोधैर्य कमी होईल. संकटाच्या काळातील आपली ही कृती वाईट दिसेल. एकत्रित काम करुयात असे आवाहन केले आहे.

युक्रेनमध्ये अडकलेल्या 249 विद्यार्थी आणि इतर भारतीय नागरिकांना घेऊन एअर इंडियाचे 5वे विमान आज सकाळी दिल्लीला पोहोचले. बुखारेस्ट, रोमानिया येथून एअर इंडियाचे फ्लाइट क्रमांक AI 1942 सोमवारी सकाळी 6.30 वाजता दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले.

युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना एअरलिफ्ट करण्यासाठी सरकारकडून ऑपरेशन गंगा चालवले जात आहे. याअंतर्गत 4 फ्लाइट्समधून 1,147 लोकांना आधीच भारतात आणण्यात आले आहे. रविवारी आलेल्या 3 फ्लाइटमधून 928 भारतीय मायदेशी पोहोचले होते.

ठाणे जिल्ह्यातील विविध शहरांमधील ५६ विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले असल्याची माहिती ठाणे जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्षाद्वारे देण्यात आली आहे. युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांची माहिती गोळा करण्यासाठी आपत्ती निवारण कक्षातर्फे शुक्रवारी काही मदत क्रमांक जाहीर करण्यात आले होते. या मदत क्रमांकांद्वारे जिल्हयातून आतापर्यंत ५६ पालकांनी त्यांची मुलं युक्रेनमध्ये अडकल्याची माहिती जिल्हा प्रशासनाला दिली आहे.

रशिया-युक्रेन यांच्यातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतीय शेअर बाजारांमध्ये विक्रीचे सत्र सुरूच असल्याचे दिसून येत आहे. बीएसईचा निर्देशांक सेन्सेक्स 1000 अंकांनी तर एनएसईचा निर्देशांक निफ्टी 200 हून अधिक अंकांनी घसरला आहे. 

रशिया व युक्रेन यांच्यात बेलारूसमध्ये चर्चा

दरम्यान, रशिया-युक्रेन या दोन्ही देशांदरम्यान बेलारूसमध्ये चर्चा झाली. ही बैठक चार तास चालली. दोन्ही देशांतील उच्च-स्तरीय शिष्टमंडळ या बैठकीमध्ये सामील झाले होते. यावेळी युक्रेनने त्यांची भूमिका मांडली आहे. रशिया आणि युक्रेन यांच्या शिष्टमंडळात दोन्ही देशातील संघर्षावर चर्चा झाली. युक्रेनमधून रशियन सैन्य मागे घ्यावं आणि क्रिमीया, डॉनबासमधूनही सैन्य काढून घेण्याची मागणी होती. युरोपियन महासंघाचं सदस्यत्व देण्यासंदर्भात मागणी युक्रेनने केली असल्याचं समजते.