दोन देशांच्या मध्ये वसलेल्या शहराची अजब कहाणी !

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

दोन देशांच्या मध्ये वसलेल्या शहराची अजब कहाणी !
नवी दिल्ली -
सीमा विवाद हे जगातील संघर्षाचे प्रमुख कारण आहे, परंतु बार्ली हे युरोपियन शहर या बाबतीत भाग्यवान आहे. या शहराचे भौगोलिक विभाजन अतिशय मजेदार आहे. अर्धे शहर नेदरलँडमध्ये आणि अर्धे बेल्जियममध्ये, असे हे शहर वसले आहे. दोन्ही देशांची सीमारेषा रस्ते, उद्याने, संग्रहालये, रेस्टॉरंट्समधूनच नव्हे तर घरांमधून देखील जाते.  म्हणजेच, अनेक घरांपैकी अर्धी बेल्जियममध्ये आणि अर्धी नेदरलँड्समध्ये आहेत.  गंमतीची गोष्ट अशी आहे की असे विचित्र विभाजन असूनही हे शहर आनंदी आहे. कारण ही सीमारेषही येथील पर्यटनाचा एक मोठा भाग आहे.  दोन देशांमध्ये विभागलेले घर, गल्ली आणि रस्ता पाहण्यासाठी पर्यटक येतात आणि छायाचित्रे घेतात. लाल विटा आणि स्वच्छ रस्त्यांच्या या शहराची ही एक गोष्ट अनोखी आहे की इथे एका देशात खुर्चीवर बसून दुसऱ्या देशात टीव्ही बघता येतो किंवा सीमा ओलांडत दोन्ही देशातून चालता येते. बेल्जियमचा भाग बार्ले हर्टॉग आणि नेदरलँड्सला बार्ले नासाऊ म्हणून ओळखला जातो.
देश स्वतंत्र झाले, पण सीमाभाग तसाच सोडला !
१८३० मध्ये बेल्जियम नेदरलँडपासून वेगळे झाले आणि एक स्वतंत्र राष्ट्र बनले. सीमा निर्धारित करणाऱ्या लोकांनी उत्तर समुद्राच्या किनाऱ्यापासून जर्मन राज्यांपर्यंत सीमा निश्चित केली, परंतु जेव्हा ते या प्रदेशात आले तेव्हा त्यांनी सीमाविषयक मुद्दा नंतर हाताळू असा विचार करून तो विषय तात्पुरता सोडून दिला. मात्र जेव्हा सीमा निश्चित जाहल्या तोपर्यंत हे शहर स्थायिक झाले होते. 
असे निश्चित झाले नागरिकत्व
सीमेची आखणी होईपर्यंत घरे बांधली गेली होती. वाद टाळण्यासाठी, ज्या देशात घराचे दरवाजे उघडतील, त्या देशाचे नागरिकत्व मिळेल, असा निर्णय घेण्यात आला.
हा कायमचा उपाय निघाला
बार्लीमध्ये दोन महापौर, दोन नगरपालिका, दोन टपाल कार्यालये आहेत. मात्र या सर्वांवर एक नियामक समिती स्थापन करण्यात आली आहे, जी परस्पर सहकार्याने समस्या सोडवते.