ऑनलाईन क्लास सुरु असताना मोबाईलचा स्फोट होऊन आठवीतला विद्यार्थी गंभीर जखमी; मध्यप्रदेशातील घटना 

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

ऑनलाईन क्लास सुरु असताना मोबाईलचा स्फोट होऊन आठवीतला विद्यार्थी गंभीर जखमी; मध्यप्रदेशातील घटना 
सटणा  -
ऑनलाईन क्लास सुरु असताना मोबाईलचा स्फोट होऊन आठवीतील एक विद्यार्थी गंभीर जखमी झाला. ही घटना मध्यप्रदेशातील सटणापासून 35 किलोमीटर दूर असलेल्या एका छोटाशा गावात घडली. जखमी मुलाला सटणा इथे नेण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. रामप्रकाश भदौरीया असं जखमी झालेल्या15 वर्षीय मुलाचं नाव आहे.

रामप्रकाश ऑनलाईन क्लास अटेंड करत होता. ऑनलाईन क्लासदरम्यान अचानकच मोबाईलचा जोरात स्फोट झाला. ज्यावेळी ही घटना घडली तेव्हा या मुलाच्या घरी कुणीही नव्हतं. मुलाचे आईवडील घरी नसल्यानं स्फोटाचा आवाज झाल्यानंतर शेजाऱ्यांचीही एकच पळापळ झाली. भयभीत झालेल्या शेजाऱ्यांना जेव्हा मोबाईलचा स्फोट झाल्याचं कळलं, त्यानंतर त्यांनी मुलाला लगेचच वैद्यकीय उपचारांसाठी दवाखान्यात नेलं. नंतर पुढील उपचारांसाठी त्याला जबलपूरच्या रुग्णालायत नेण्यात आलं असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

दरम्यान, मोबाईलचा स्फोट नेमका कशामुळे झाला, याबाबची माहिती मिळू शकलेली नाही. मात्र मोबाईलची बॅटरी ओव्हरचार्ज झाल्यानं किंवा मोबाईल फोन गरम झाल्यामुळे त्याला स्फोट झाला असावा, असा संशय व्यक्त केला जातोय.