क्रौर्याचा कळस ! भिंतीवर डोकं आपटून 27 दिवसांच्या बाळाला आईने संपवलं !

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

क्रौर्याचा कळस ! भिंतीवर डोकं आपटून 27 दिवसांच्या बाळाला आईने संपवलं !
तिरुअनंतपुरम  -
सतत रडणाऱ्या बाळामुळे त्रास होत असल्याने जन्म देणाऱ्या आईनेच भिंतीवर डोकं आपटून आपल्या अर्भकाचा जीव घेतला. आरोपी आईला पोलिसांनी अटक केली आहे. केरळात ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. बाळाचा प्रिमॅच्युअर जन्म झाला होता. आजारी असल्यामुळे बाळ सारखं रडायचं. त्याला वैतागून 21 वर्षीय आईने त्याची हत्या केल्याचा आरोप आहे.

नऊ डिसेंबरला ही घटना घडल्याचं समोर आलं आहे. त्याच दिवशी दुपारी 11 वाजता रुग्णालयात नेण्यात आलं होतं. डॉक्टरांना दाखवल्यानंतर बाळाला परत घरी सोडण्यात आलं. मात्र बाळाचा प्रकृती त्यानंतर ढासळत गेली. अखेर त्याला तालुक्यातील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले, तिथे त्याचा मृत्यू झाला.

एक आश्रम चालवणारे फादर जोजी थॉमस यांच्या जबाबावरुन पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला. संबंधित 21 वर्षीय तरुणी या आश्रमात स्वयंपाकाचे काम करत होती. तिच्या 45 वर्षीय प्रियकरासोबत ती राहत होती. तरुणीचा प्रियकर आधीपासून विवाहित होता. याविषयी तिला माहिती होती, असं पोलीस चौकशीत समोर आलं. महिलेने स्वतःच बाळाची हत्या केल्याचं समोर आल्यानंतर पोलिसांनी तिला अटक केली.

10 डिसेंबरला बाळाचे पोस्टमार्टम करण्यात आले. त्यावेळी डॉक्टरांनी बाळाच्या डोक्यावर जखम असल्याचं पोलिसांना सांगितलं. त्यानंतर पोलिसांनी बाळाच्या आई-वडिलांकडे चौकशी केली.