किम जोंग उनचा नवा हुकूम: 11 दिवस एकही नागरिक हसणार नाही, मद्यपान आणि खरेदीवर बंदी !
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
नवी दिल्ली -
उत्तर कोरियाने नागरिकांना 11 दिवस हसण्यावर, मद्यपानावर आणि खरेदीला जाण्यास बंदी घातली आहे. किम जोंग-उन यांनी शुक्रवारी त्यांचे वडील किम जोंग-इल यांच्या 10 व्या पुण्यतिथीनिमित्त हा आदेश जारी केला. किम यांनी शुक्रवारपासून पुढील 11 दिवस देशात राष्ट्रीय शोक जाहीर केल्याचे वृत्त आहे. त्यामुळे या कालावधीसाठी नागरिकांची सर्व विश्रांतीची कामे बंद करण्यात आली आहेत.
किम जोंग यांनी लागू केलेल्या या निर्बंधांना उत्तर कोरियातील अनेक नागरिकांनीही दुजोरा दिला आहे. रेडिओ फ्री एशियाने देशाच्या सीमेवर असलेल्या सिनुइजू शहरातील रहिवाशांच्या हवाल्याने म्हटले आहे की, सामान्य लोक रोजच्या वस्तू खरेदी करण्यासाठी घराबाहेर पडू शकत नाहीत. नियम मोडणाऱ्यांना अटक करण्याबरोबरच त्यांना कठोर शिक्षेची तरतूदही आहे.
एका नागरिकाने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, "याआधी किम जोंग-इलच्या पुण्यतिथीला मद्यपान करताना किंवा नशेच्या अवस्थेत सापडलेल्या लोकांना अटक करण्यात आली होती आणि गुन्हेगारांप्रमाणे ठेवण्यात आले होते. अनेकांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर शोधाची कोणतीही बातमी नाही."
या नागरिकाने पुढे सांगितले की, "11 दिवसांच्या शोकात एखाद्याचा मृत्यू झाला, तरी त्याच्या कुटुंबीयांना मोठ्याने रडण्याची परवानगी नाही. याशिवाय त्याचा मृतदेह अंतिम संस्कारासाठी तेव्हाच नेण्यात यावा, जेव्हा हा 11 दिवसांचा शोक संपेल. या शोकाच्या काळात लोक वाढदिवसही साजरा करू शकत नाहीत."