लग्नानंतर विकीकडून अंकिताला मालदीवमध्ये लक्झरी व्हिला भेट ! मित्रमैत्रिणींनीही उभयतांना दिले महागडे गिफ्ट !

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

लग्नानंतर विकीकडून अंकिताला मालदीवमध्ये लक्झरी व्हिला भेट ! मित्रमैत्रिणींनीही उभयतांना दिले महागडे गिफ्ट !

मुंबई -  

अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांचा विवाह 14 डिसेंबर 2021 रोजी मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये थाटामाटात झाला. लग्नानंतर दोघांनी ग्रँड रिसेप्शन पार्टीचे आयोजन केले होते. ज्यामध्ये अंकिता आणि विकीचे सर्व मित्र सामील होते. या जोडप्याचे लग्न किती छान झाले असेल, याचा अंदाज त्यांच्या लग्नाच्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोंवरून लावता येतो. अंकिता आणि विकी 2018 पासून एकमेकांना ओळखतात. विकिने त्याच्या पत्नीला म्हणजेच अंकिताला मालदीवमध्ये एक आलिशान व्हिला भेट दिल्याचे वृत्त आहे.

विकीने अंकिताला मालदीवमध्ये एक आलिशान व्हिला भेट दिला आहे, ज्याची किंमत 50 कोटींहून अधिक असल्याचे बोलले जात आहे. यासोबतच अंकिताने विकीसाठी एक प्रायव्हेट यॉटही खरेदी केली आहे, ज्याची किंमत 8 कोटी रुपये आहे. विकीला हे खूप आवडते.

अंकिता आणि विकीच्या सर्व मित्रांनी त्यांना एकापेक्षा एक भेटवस्तू देखील दिल्या आहेत, ज्या खूप महाग आहेत. एकता कपूरने अंकिताला 50 लाखांचा डायमंड सेट भेट दिला आहे. माही विजने सब्यसाची कलेक्शनमधून 15 लाखांची साडी भेट दिली आहे.

रित्विक धनजानीने विकी जैनला एक आलिशान घड्याळ आणि अंकिता लोखंडेला डायमंड चोकर भेट दिली आहे. त्याची किंमत 15 लाख रुपये आहे. टायगर श्रॉफने अंकिता लोखंडेला 'मिनी कूपर' ब्रँडची कार दिली आहे. अभिनेत्री सृष्टी रोडे हिने अंकिता लोखंडे हिला सोन्याची चेन भेट दिली आहे.

अंकिता तिच्या लग्नाबद्दल नेहमीच उत्सुक होती आणि तिला मोठ्या थाटामाटात लग्न करायचे होते आणि तसेच झाले. विकी जैन आणि अंकिताच्या लग्नाच्या फोटोंनी सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे. अंकिता आणि विकीने 2018 साली एकमेकांना डेट करायला सुरुवात केली होती. विकी हा प्रसिद्ध उद्योगपती आहे.