कोणीही अमृत पिऊन सत्तेत बसले नाहीत, २०२४ ला आम्ही चमत्कार घडवू ! नवाब मलिकांचे वक्तव्य

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

कोणीही अमृत पिऊन सत्तेत बसले नाहीत, २०२४ ला आम्ही चमत्कार घडवू ! नवाब मलिकांचे वक्तव्य

मुंबई -  

'ही लोकशाही आहे. अमृत पिऊन कोणी सत्तेत बसत नाही, हे देवेंद्रजी यांना कळले पाहिजे. देवेंद्रजी जेव्हा पवार साहेबांवर टीका करतात तेव्हा चमत्कार घडतात. आम्ही २०२४ ला चमत्कार घडवू”, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक यांनी केले. भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधानपदावरून शरद पवारांवर अप्रत्यक्षरीत्या टीका केल्यानंतर प्रत्युत्तरादाखल मंत्री नवाब मलिक यांनी त्यांच्या टिकेचा खरपूस समाचार घेतला.  

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव त्यांच्यावर झाला. २८ खासदार असणाऱ्या गुजरातमधील असणारी व्यक्ती पंतप्रधान बनू शकते तर ४८ खासदार असलेल्या महाराष्ट्रातील महाराजांचा मावळा हा सर्वोच्च स्थानी का विराजमान होणार नाही असं वक्तव्य अमोल कोल्हे यांनी केलं होतं. तेव्हा पंतप्रधान होण्याचं स्वप्न पहाणं वाईट नाही, पण त्यांचा पक्ष १० खासदारांचा आकडाही पार करु शकला नाही अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली होती.

मलिक पुढे म्हणाले की, पवार साहेब पंतप्रधान होतील असा कुठलाही दावा केलेला नाही. उलट पवार साहेब देशातल्या सर्व राजकीय पक्षांना एकत्र आणण्याचे काम करत आहेत आणि विरोधकांच्या एकजुटीमुळे मोदी सरकार हे सत्तेतून बाहेर जाईल हे आमचे म्हणणे आहे. देवेंद्रजी तुम्ही शाळेत होतात तेव्हा ८४ साली लोकसभा निवडणुकीत भाजपची संख्या दोनवर गेली होती आणि तुमचे खासदार सायकलवर बसून डबलसीट संसदेत जात होते, हे तुम्ही विसरला का ?, असे नवाब मलिक म्हणाले.