भाजप पाठोपाठ मनसेचे नांदगावकर, देशपांडे, राजू पाटील यांचेही शिवसेनेवर टीकास्त्र
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
राज्यसभेच्या निवडणुकीत शिवसेनेचा उमेदवार पडल्याने शिवसेनेवर विशेषतः संजय राऊत यांच्यावर भाजपकडून खिल्ली उडवताना दिसतीय. त्यातच आता मनसेनेही उडी घेत टीकेच्या या वाहत्या गंगेत हात धुवून घेताना दिसत आहे. शिवसेनेचे बाळा नांदगावकर, देशपांडे, मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांनीही शिवसेनेवर टीका केली आहे.
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वतः पक्ष चालवायला हवा. अजूनही वेळ गेलेली नाही. आपली माणसे प्रेमाने सांभाळावी लागतात. आजूबाजूच्या लोकांनी पक्ष चालवू नये. अशी शेलक्या शब्दात मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी शिवसेनेवर टीका केली आहे.
पूर्वी बाळासाहेबांच्या आदेशाने सर्व घडत होते. मात्र आता ते दिवस राहिले नाहीत. आपली माणसे प्रेमाने सांभाळावी लागतात. पण सध्या काही लोक स्वतःला पक्षप्रमुख समजून पक्ष चालवत असल्याने हीच का ती शिवसेना? असं म्हणण्याची वेळ आलेली आहे.' असा टोला बाळा नांदगावकर यांनी राज्यसभेच्या पराभवानंतर शिवसेनेला लगावला आहे.
'राज्यसभेच्या निकालापासून शिवसेना आत्मचिंतन करून धडा घेईल ही अपेक्षा आहे आणि विधान परिषदेत योग्य ते घडेल.' अशी आशाही बाळा नांदगावकर यांनी व्यक्त केली आहे.
मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी ट्विट करून शिवसेनेला डिवचलं आहे. शिवसेना ही महाविकास आघाडीतील "ढ"टीम आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालं. बोरू बहाद्दर कारकून आणि "ढ" टीम चे कप्तान तोंडावर आपटले, असं म्हणत त्यांनी शिवसेनेच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम केलं आहे. त्यांनी शिवसेनेला "ढ"टीम म्हणत त्यांची खिल्ली उडवली आहे.
दरम्यान विजयी झालेल्या सर्व उमेदवारांचे मनसे आमदार यांनी ट्विटरवरून अभिनंदन केले आहे. तर दुसरीकडे शिवसेनेला ट्विटरवरून टोला सुद्धा हाणला आहे. औरंग्याच्या कबरीवर डोकं टेकवणाऱ्यांसमोर त्यांच्या दोन मतांसाठी गुडघे टेकून काय मिळवले ? सेनाप्रमुखांच्या विचारांना दफन करून कट्टर सैनिकाचा बळी पण दिला. सेना लढाईतही हरली व तहात पण हरली, अशा शब्दांत राजू पाटील यांनी टीका केली आहे.
दरम्यान, शिवसेनेने जर राज ठाकरेंशी संपर्क साधला असता तर कदाचित राजू पाटिल यांचे मत शिवसेना उमेदवाराला मिळाले असते असे आता बोलले जात आहे.