जिल्हास्तरावर निर्बंध लागू होऊ शकतील ? आयसीएमआरचा महत्त्वाचा इशारा !

जिल्हास्तरावर निर्बंध लागू होऊ शकतील ? आयसीएमआरचा महत्त्वाचा इशारा !

नवी दिल्ली -

ज्या भागात कोविडचा पॉझिटिव्हीटी रेट ५ टक्क्यांपर्यंत पोहोचेल त्याठिकाणी जिल्हा स्तरावरील निर्बंध लादले जातील, असा इशारा आयसीएमआर (Indian Council of Medical Research)चे प्रमुख बलराम भार्गव यांनी दिला. जागतिक परिस्थिती लक्षात घेता देशातल्या सध्याच्या कोविडच्या परिस्थितीवर लक्ष ठेवलं जातं, असं  जगभरात ओमिक्रॉनचा प्रसार वेगानं होत असल्याचे निदर्शनास आणतानाच त्यांनी याबाबतची माहिती निवेदनाद्वारे दिली. ओमिक्रॉनचा धोका आणि त्यासंबंधी जागृती करण्यासंदर्भात नियमित बैठका घेतल्या जात आहेत, असेही त्यांनी म्हटले. 

महाराष्ट्रात ओमिक्रॉनबाधित 10  रुग्ण असून त्यापैकी 7 पुणे जिल्ह्यात आहेत. हे सर्व रुग्ण लक्षणं नसलेली अथवा कमी लक्षणे असणारे आहेत. जिल्ह्यात लसीकरण(Vaccination)चा वेग वाढविण्यात आलाय. मागील 10 दिवसात 8 लक्ष लसीकरण करण्यात आलं असून त्यापैकी पहिली मात्रा 33 टक्के तर 67  टक्के दुसरी मात्रा देण्यात आलीय. जिल्ह्यानं लसीकरणात 1  कोटी 38  लाखाचा टप्पा पार केला असून जिल्हा राज्यात दुसऱ्या क्रमांकावर आहे. कोविडमुळे मृत्यू झालेल्या 19 हजार 174 व्यक्तींच्या वारसांना प्रत्येकी 50 हजार रुपयांची मदत मिळणार आहे. राज्य शासनाच्या सूचनेनुसार त्याबाबत कार्यवाही सुरू आहे, अशी माहिती त्यांनी दिली.