शरद पवारांवर विकृत ट्विट करणाऱ्या भांबरे यास अटक

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

शरद पवारांवर विकृत ट्विट करणाऱ्या भांबरे यास अटक

नाशिक, दि. १५ मे - सटाणा येथील २३ वर्षीय निखिल भांबरे यास शरद पवार यांच्यावर विकृत व धमकी देणारे ट्विट केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.

निखिल याने अॅडव्होकेट भावे यांच्या नावाने ट्विटरवर बनावट अकाऊंट उघडून शरद पवार यांच्यावर अश्लाध्य कविता पोस्ट केली होती. तीच कविता अभिनेत्री चितळे हिने रिट्विट केले होते. निखिल हा फार्मसीचा विद्यार्थी आहे. केतकी चितळेवर राज्यात 11 ठिकाणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तिला पोलिसांनी अटक केली आहे. त्यानंतर रविवारी सकाळी तिला न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी तिला 18 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. न्यायालयात तिने स्वतःच स्वतःची बाजू मांडली होती. मी पोस्ट केवळ फॉरवर्ड केली आहे. सोशल मीडियात मत मांडण्याचा आपल्याला अधिकार नाही का, असा सवाल तिने न्यायालयात उपस्थित केल्याचे समजते. त्यानंतर तिला कोठडी सुनावण्यात आली.

राज्याच्या सायबर गुन्हे शाखेने या प्रकरणाची सखोल तपासणी करून मूळ गुन्हेगार निखिल भांबरे यासही अटक केली आहे.

यापूर्वीही केतकी चितळे हिने वादग्रस्त पोस्ट केल्या होत्या. अभिनेत्री केतकी चितळे हिला अपस्माराचा आजार आहे. तिच्या फिट्स वर अनेक वर्षांपासून उपचार सुरू आहेत. 

दरम्यान तिच्यावर अनेक नेत्यांनी टीका केली आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तिला विकृत ठरवून अशा दोन-चार विकृत टाळक्यांमुळे वातावरण खराब होत आहे असे म्हटले आहे. कोणीतरी केतकी चितळे नामक व्यक्तीने अतिशय खालच्या पातळीवर जाऊन घाणेरड्या शब्दात काहीतरी लिहून फेसबुकवर पोस्ट प्रकाशित केलेली आमच्या निदर्शनास आणली गेली. खाली काहीतरी भावे वगैरे असं नाव टाकले आहे. हे जे लिखाण आहे त्याला महाराष्ट्र संस्कृतीत जागा नाही. त्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो,'' अशा शब्दांत राज यांनी सुनावले आहे.

कोणत्याही व्यक्ती विरोधात आक्षेपार्ह टीका टिपणी करणे योग्य नाही. टीका करण्याचा एक स्तर असतो. तो सोडता कामा नये. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गैरवापर करणे योग्य नाही, या शब्दात भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी केतकी चितळे प्रकरणावर प्रतिक्रीया व्यक्त केली आहे.