महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर आरोप-प्रत्यारोपांच्या फटाक्यांचा दणदणाट !
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
शिवसेना-भाजप सरकारच्या काळात नीरज गुंडे हा देवेंद्र फडणवीस यांचा दूत म्हणून काम करत होता. पोलिसांच्या बदल्यांपासून ते मंत्रालयातील कामे मार्गी लावण्यात त्याची महत्त्वाची भूमिका होती. एवढेच नव्हे तर शिवसेना आणि भाजपमध्ये तणाव निर्माण झाल्यानंतर नीरज गुंडे मातोश्रीवर निरोप घेऊन जायचा, असा दावा नवाब मलिक यांनी केला होता. मात्र, देवेंद्र फडणवीस यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले. उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांना कोणाच्याही मांडवलीची गरज पडत नाही. आम्ही मांडवली नव्हे तर चर्चा करतो, असे देवेंद्र यांनी स्पष्ट केले.
लोकांचं लक्ष डायव्हर्ट करण्यासाठी नवाब मलिकांचं नाटक सुरू- किरीट सोमय्या
सोमय्या पुढे म्हणाले की, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक हजार कोटींपेक्षा अधिक रक्कम नातेवाईकांच्या खात्यात वर्ग केली आहे. आम्ही तसा आरोप केला होता. मात्र, ईडी आणि आयकर विभागाच्या धाडीतून हे सिद्ध झालं आहे. त्यावरून लक्ष विचलीत करण्यासाठीच समीर वानखेडे आणि अमृता फडणवीस यांच्यावर टीका केली जात आहे. समीर वानखेडे आणि अमृता फडणवीस इतकं गलिच्छ राजकारण केवळ शरद पवार आणि उद्धव ठाकरेच करू शकतात. नवाब मलिकची एवढी कॅपेसिटी नाही, असं सांगतानाच केवळ लक्ष डायव्हर्ट करण्यासाठी हे नाटक सुरू आहे. 19 दिवस ईडीची धाड सुरू आहे हे अजित पवारांनी सांगांवं, असं सोमय्या म्हणाले.
नवाब मलिक गेल्या 12 दिवसांपासून वानखेडेंवर आरोप करत आहेत. वानखेडे यांनी 2006मध्ये लग्न केलं. त्या आधी शेड्यूल कास्ट म्हणून ते नोकरीला लागले. तेव्हा तुमची अक्कल कुठे गेली होती? 2007मध्ये आयएएस, आयआरएस म्हणून ते सिलेक्ट झाले. तेव्हा का गप्प बसला? 2015-16मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर तुम्ही का गप्प बसला होता? कधी वानखेडेचं नाव काढायचं तर कधी अमृता फडणवीसांवर टीका करायची, ही काय नौटंकी आहे? का ही पेड पब्लिसीटी? असा हल्ला त्यांनी चढवला. अजित पवारांनी एक हजार 50 कोटीची बेनामी संपत्ती कशी जमवली? पवार कुटुंबांच्या जावयाच्या खात्यात पैसे कुठून आले आणि कसे गेले? याचं उत्तर ठाकरे पवारांना द्यावे लागेल. या सहा फटाक्यांपैकी पहिला फटका मी फोडला आहे. हिंमत असेल तर ठाकरे पवारांनी यावर उत्तर द्यावं, असंही ते म्हणाले.