देशात कराेनाचा हाहाकार
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
पुणे, (प्रबोधन न्यूज) - देशात करोनाचा हाहाकार रोजच वाढत असून दैनंदिन रुग्णसंख्येत मोठी भर पडत आहे. गुरुवारी (दि.१५) एकाच दिवसात दोन लाखांचा टप्पा करोना रुग्णांनी ओलांडला आहे. तर सलग दुसऱ्या दिवशी एक हजाराहून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य मंत्रालयाने ही माहिती जाहीर केल्यानंतर करोनाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर बनत चालल्याचे समोर आले आहे.
देशात गेल्या २४ तासात २ लाख ७३९ करोना रुग्ण आढळले असून ९३ हजार ५२८ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. तर १०३८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत देशातील एकूण रुग्णसंख्या १ कोटी ४० लाख ७४ हजार ५६४ जणांना करोना झाला असून त्यापैकी १ कोटी २४ लाख २९ हजार ५६४ जणांनी करोनावर मात केली आहे. सध्या १४ लाख ७१ हजार ८७७ ॲक्टिव्ह रुग्ण असून मृत रुग्णांची संख्या १ लाख ७३ हजार १२३ इतकी झाली आहे. देशात आतापर्यंत ११ कोटी ४४ लाख ९३ हजार २३८ जणांचं लसीकरण करण्यात आलं आहे.
बुधवारी देशात करोनाचे एक लाख ८४ हजार ३७२ रुग्ण आढळले होते. दैनंदिन रुग्णवाढीचा हा आतापर्यंतचा उच्चांक होता. मात्र गुरुवारी रुग्णसंख्या दोन लाखांच्या पुढे गेली आणि नव्या उच्चांकाची नोंद झाली. बुधवारी करोनाने १,०२७ जणांचा बळी घेतला. गेल्या सहा महिन्यांतील करोनाबळींचा हा उच्चांक ठरला आहे. देशात सर्वाधिक रुग्णवाढ महाराष्ट्रात नोंदवली जात आहे. इतर राज्यांतही रुग्णवाढ झपाट्याने होत असून, गेल्या २४ तासांत उत्तर प्रदेशात २०,५१२ नवे रुग्ण आढळले. गेल्या २४ तासांत महाराष्ट्रापाठोपाठ छत्तीसगडमध्ये १५६ करोनाबळींची नोंद झाली. छत्तीसगडमध्ये दैनंदिन रुग्णवाढीने १५ हजारांचा टप्पा ओलांडला. मध्यप्रदेशात दिवसभरात ८,९९८ रुग्ण आढळले तर ५१ रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यातील हा आतापर्यंतचा उच्चांक आहे.