राज ठाकरे यांच्या भेटीनंतर प्रसाद लाड यांचे 'मनसे-भाजप' समीकरणावर सूचक विधान
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
मुंबई बँकेच्या निवडणुकीनिमित्त सहकार पॅनल स्थापन करण्यात आलं आहे. या पॅनलमध्ये मनसेनेही सामील व्हावं म्हणून प्रसाद लाड यांनी आज राज ठाकरे यांची भेट घेतली. लाड यांनी राज ठाकरे यांच्याशी दीर्घ चर्चा केली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. मुंबई जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या संदर्भात ही भेट होती. सर्व पक्षाच्या नेतृत्वाने सहकार पॅनेल सोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवून बँकेची निवडणूक झाली पाहिजे हा सर्वांचा प्रयत्न होता. त्याबाबतीत राज यांच्याशी चर्चा केली. या संदर्भात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि त्यांचं फोनवर बोलणं करून दिलं. दरेकर लवकरच राज ठाकरेंना भेटायला येतील. राज ठाकरे सहकार पॅनलसोबत येतील ही अपेक्षा आहे. ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी मदत होईल, असं त्यांनी सांगितलं.
गेल्याच महिन्यात देवेंद्र फडणवीस हे राज ठाकरेंना भेटले होते. आता आमच्यासमोर जिल्हा बँकेचा विषय आहे. सहकार पॅनल निवडून आणणं हे आमचं उद्दिष्ट आहे. सहकारात राजकारण नको. शिवसेना, काँग्रेस,. राष्ट्रवादी आमच्यासोबत आली. तसंच मनसेही सोबत यावी ही अपेक्षा आहे. सहकारातून सहकार्य करण्यासाठीच सहकार असतो. त्याचा अर्थ तोच असतो. तोच प्रयत्न होत आहे. मनसे नेत्या रिटा गुप्ता आणि इतर नेते उद्या आमची भेट घेतील. त्यानंतर दरेकर आणि नलावडेंची भेट घेऊन ते पुढचा निर्णय जाहीर करतील, असंही त्यांनी स्पष्ट केलं.