आम्हीही देश विकणाऱ्यांविरोधात कोर्टात जाणार- नाना पटोले

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

आम्हीही देश विकणाऱ्यांविरोधात कोर्टात जाणार- नाना पटोले

मुंबई -

राज्यात सध्या नाना पटोलेंच्या वक्तव्याविरोधात भाजप आक्रमक झाली असून राज्यात जोरदार गदारोळ सुरू आहे. चंद्रकांत पाटलांनी तर पटोलेंविरोधात कोर्टात जाण्याचा इशारा दिला आहे, त्याला आता नाना पटोलेंनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. चंद्रकांत पाटलांनी माझ्या विरोधात कुठे जायचं तिकडं जावं, आम्हीही देश विकाणाऱ्यांविरोधात कोर्टात जाणार असे नाना पटोले म्हणाले. 

विमानतळ विकले, समुद्र विकले, कंपन्या विकल्या आहेत, त्याविरोधात आम्हालाही कोर्टात जावं लागेल असे नाना पटोले म्हणाले आहेत. तसेच भंडारा पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. त्यात सत्य समोर येईल. पंतप्रधान पदाची गरीमा संपवणे हाच भाजपचा धंदा आहे. त्यामुळे त्यांनी हे सुरू केले आहे. आम्हीही काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना भाजपविरोधात गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहे. असेही ते म्हणाले. तसेच मोदी नावाचा गुंड पोलिसांनी ताब्यात घेतला आहे, जबाब नोंदवणे सुरू आहे, अशी माहिती नाना पटोलेंनी यावेळी दिली आहे.

नाना पटोलेंविरोधात भाजप आज राज्यभर आंदोलन करत आहे, त्यावरूनही नाना पटोले यांनी भाजपवर पलटवार केला आहे. यातील काही जण कोरोना पॉझिटिव्ह होते, ते आंदोलनात आहेत, पंतप्रधान मोदींनी गर्दी टाळण्याचे, कोरोना नियम पाळण्याचे आवाहन केले आहे. हे पंतप्रधानांचं ऐकत नाहीत, मग कसले मोदी भक्त? असा सवाल पटोलेंनी विचारला आहे. तसेच मी जीवे मारेन असे म्हटलं नव्हतं, मारणं आणि जीवे मारणं यातला फरक कळतो का? असे म्हणत भाजप नेत्यांच्या बुद्धीची किव येते, अशी खिल्ली नाना पटोलेंनी उडवली आहे.

पंजाबमध्ये मोदी दौऱ्यावर गेले त्यावेळी पंजाब सरकारने दौऱ्यावर बोलवलं नव्हतं, हे आपले राजकीच दुकान चालवायला गेले होते, त्यातही भाजपने नौटंकी केली. कोण कुणाला मारायला निघालं? कशा प्रकारची नौटंकी भाजपकडून सुरू आहे, हे सर्वांच्या लक्षात येत आहे, असेही ते म्हणाले. तसेच पोलिसांच्या कारवाईनंतरच यावर बोलता येईल, असं सूचक विधान पटोले यांनी केलं आहे. गेल्या काही तासांपासून राज्याच्या राजकारणात एकच नाव चर्चेत आहे, ते म्हणजे नाना पटोलेंचं या व्हिडिओनंतर नाना पटोलेंवर टीका करण्याची एकही संधी भाजप नेत्यांकडून सोडण्यात येत नाही, त्या नेत्यांना नाना पटोलेंनीही आता प्रत्युत्तर दिलंय.